डोंबिवलीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, 85 वर्षीय नराधमाला बेड्या

मुंबई तक

• 01:31 PM • 17 Sep 2026

Dombivali crime : ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली टाउनशिपमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक छळ केल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात 85 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

Dombivali crime

Dombivali crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चिमुरडीला फसवून घरी बोलावून केला अत्याचार 

point

आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Dombivali Crime : ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली टाउनशिपमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक छळ केल्याचा मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात 85 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेदरम्यान पीडित मुलगी ही तिच्याच घराबाहेर खेळत होती, तर तिची आई ही घरात काम करत होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्मिती, 'या' राशींचा आजचा दिवस शुभ

चिमुरडीला फसवून घरी बोलावून केला अत्याचार 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कथितरित्या चिमुरडीला फसवून आपल्या घरी बोलावले होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपी चिमुकलीला घरात घेऊन आला होता. संबंधित प्रकरणातील एफआरआयनुसार, आरोप केला की, आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला होता. 

आईनेच चिमुरडीला आरोपीच्या ताब्यातून बाहेर काढले

लहान मुलगी आई वडिलांना बराच वेळ दिसून आली नव्हती. त्यानंतर त्यांनी पुढील तपास सुरू केला होता. यादरम्यान, ती आरोपीच्या घरी पोहोचली असता, लहान मुलगी तिथेच होती. आईने मुलीला आरोपीच्या घरातून बाहेर काढले आणि नंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या आईने डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 75 (2) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 8 अंतर्गत कारवाई केली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. 

हे ही वाचा : फार्महाऊसवर नेऊन सामुहिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप, माजी आमदारासह दोघांवर गुन्हा दाखल

केवळ राज्यातच नाही,तर देशभरात अशा घटना घडत आहेत. यामुळे महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. संबंधित प्रकरणात पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.