तरुणांसोबत लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणी, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

मुंबई तक

• 08:00 AM • 18 Sep 2026

Crime News : एका लॉजमध्ये दोन तरुणांसोबत एक तरुणी गेली होती, मात्र ती पुन्हा तिथून परतलीच नाही. काही वेळानंतर संबंधित लॉजच्या बाथरूममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूमागील गूढ अद्यापही उलगडलेले नाही.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणांसोबत लॉजमध्ये गेली तरुणी

point

बाथरूममध्ये आढळला मृतदेह 

Crime News : कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लॉजमध्ये दोन तरुणांसोबत एक तरुणी गेली होती, मात्र ती पुन्हा तिथून परतलीच नाही. काही वेळानंतर संबंधित लॉजच्या बाथरूममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूमागील गूढ अद्यापही उलगडलेले नाही. हे प्रकरण कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपुरा तालुक्यातील वललहल्ली शहरातील आहे. या घटनेनं शहर हादरून गेले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोवर अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने पत्नीवर हल्ला करत धडापासून वेगळं केलं डोकं

तरुणांसोबत गेलेल्या तरुणाचा लॉजच्या बाथरूममध्ये मृत्यू 

पोलिसांच्या माहितीनुसार, बंगळुरूतील चिक्कबनवरा येथील रहिवासी असलेल्या वर्षा (वय 23) हिचा लॉजच्या बाथरूममध्येच दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणीसोबत तीन तरुण होते, ते अद्याप सापडलेले नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, दोन तरुणांसोबत हसन ही सकलेशपुरा येथे गेली होती. त्या तिघांनी मिळून श्रीदेवू लॉजमध्ये चेक-इन केले होते. सकाळी पीडित तरुणी बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती आणि दोन तरुण हे बेपत्ता झाले होते. 

तरुणीच्या मृत्यूनंतर आरोपी फरार 

घडलेल्या घटनेच्या माहितीनुसार, महिला गेल्या काही दिवसांपासून शुक्रवारी दोन तरुणांसोबत लॉजमध्ये आली होती. तरुणीच्या मृत्यूनंतर ते दोघेही फरार झाले आहेत. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली असता, त्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला होता. तिच्या मृत्यूसाठी ते तरुणच जबाबदार होते की आणखी काही कारण आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

हे ही वाचा : गुप्तांगाला जखमा..,बारामतीत गरोदर महिलेचा मृतदेह आढळला; सगळा घटनाक्रम मुंबई Takवर

संबंधित प्रकरणात पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन तपास केला आणि माहिती गोळा केली. पोलीस या प्रकरणात आरोपींचा शोध घेत आहेत. तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीस सोडले जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.