गुप्तांगाला जखमा..,बारामतीत गरोदर महिलेचा मृतदेह आढळला; सगळा घटनाक्रम मुंबई Takवर

मुंबई तक

Baramati Crime News : बारामतीच्या पणदरे एमआयडीसी परिसरात महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेश रामचंद्र माने याला पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Baramati Crime News
Baramati Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बारामतीत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला

point

सगळा घटनाक्रम मुंबई Tak वर

Baramati Crime News : बारामतीच्या पणदरे एमआयडीसी परिसरात एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेश रामचंद्र माने (वय 26) याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 तारखेला संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिला घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी घरात शिरला. त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते. मात्र, महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने हातोड्याने तिच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीने खोलीतून टॉवेल अन् गळा आवळून संपवलं 

दरम्यान, महिला या प्रकाराला विरोध करत होती आणि ओरडत होती. त्यामुळे आरोपीने पुन्हा तिच्या डोक्यात हातोड्याने मारल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. या मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव झाला. त्यानंतरही आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली. हा प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी आरोपीने खोलीतून टॉवेल आणला आणि त्याच्या सहाय्याने महिलेचा गळा आवळून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले आणि पायातील पैंजण काढून घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली

घटना समोर आल्यानंतर महिलेच्या जवळच्या व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. घरात जाऊन पाहिले असता संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता गणेश रामचंद्र माने याच्याबाबत माहिती मिळाली. त्याची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिलेच्या पोस्टमॉर्टमदरम्यान ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा आढळल्या असून, गुप्तांगालाही जखमा झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात महिलेवर हल्ला करण्यासाठी वापरलेला हातोडा, आरोपीच्या अंगावरील कपडे तसेच सोन्याचे डोरले आणि पैंजण पोलिसांनी जप्त केले आहेत. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी काही कलमांची वाढ करण्यात आली आहे. या घटनेमुळे पणदरे परिसरात खळबळ उडाली आहे.