26 वर्षीय बायकोवर नवऱ्याकडून कुऱ्हाडीने हल्ला, नंतर अ‍ॅसिड फेकलं अन्..

मुंबई तक

• 07:15 PM • 17 Sep 2026

Crime News : एका 26 वर्षीय नर्सवर तिच्याच नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक हल्ला केला. एका क्लीनिकजवळील बेसमेंटच्या पार्किंगमध्ये नवऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर पीडितेवर अ‍ॅसिडने हल्ला केल्याची माहिती समोर आली.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने पीडित बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला करत अॅसिड फेकलं

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : बंगळुरू येथे मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 26 वर्षीय नर्सवर तिच्याच नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक हल्ला केला. एका क्लीनिकजवळील बेसमेंटच्या पार्किंगमध्ये नवऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर पीडितेवर अ‍ॅसिडने हल्ला केल्याची माहिती समोर आली. या अचानकपणे झालेल्या हल्ल्यात परिसरातील लोक भयभीत झाले होते आणि स्वत:चा बचाव करण्यासाठी घटनास्थळावरून पळू लागले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मला खेदाने सांगावं वाटतं की, रोहित शर्मा बेडवर चांगला नाही', मॉडेलने उडवून दिली खळबळ

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणातील गंभीर जखमी महिला ही कोलकाता येथील रहिवासी मधुमती (वय 26) अशी तिची ओळख समोर आली. मागील दीड वर्षांपासून एका स्थानिक क्लिनिकमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. पोलिसांच्या सुरूवातीच्या तपासानुसार, सकाळी 9:15 वाजता मधुमती हा नाश्ता करण्यासाठी बाहेर गेली होती. यादरम्यान, नवरा वेंकटेशन हा तामिळनाडुतील रहिवासी तिचा मग काढत रुग्णालयाच्या इमारतीत शिरला. 

नवऱ्याने पीडित बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला करत अ‍ॅसिड फेकलं

दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, आरोपी व्यंकटेशन हा दुचाकीवरून आला आणि त्याने चाकू, कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर त्याने कोणताही विचार न करता अ‍ॅसिड हल्ला केला. यादरम्यान पीडितेनं आरडाओरड केली असता, काही नर्स आणि इतर स्टाफ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडितेची मदत केली. इतक्यात पीडित मधुमती स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धावू लागली होती. इतक्यात ट्रॅफिक पोलिसांनी मधुमतीला पाहिलं असता, व्यंकटेळश तिच्या मागे धावताना त्याला ताब्यात घेतले. 

हे ही वाचा : बीडच्या तरुणाची लातूरमध्ये निर्घृण हत्या, 10 लाखांच्या वादातून कोयत्याने सपासप वार

पीडितेवर कुऱ्हाडीने हल्ला केला, नंतर तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू ठेवले. यानंतर मधुमतीची प्रकृती  नाजूक आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.