'मला खेदाने सांगावं वाटतं की, रोहित शर्मा बेडवर चांगला नाही', मॉडेलने उडवून दिली खळबळ

मुंबई तक

सोफिया हयातने एकेकाळी बॉलिवूड आणि क्रिकेटच्या जगात बरीच प्रसिद्धी मिळवली होती. आता, तिच्या नवीन पॉडकास्टमध्ये, तिने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार रोहित शर्मासोबतच्या तिच्या नात्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे.

ADVERTISEMENT

i dated rohit sharma ipl lucky mascot sofia hayat makes a claim reveals details of relationship
सोफिया हयातने उडवून दिली खळबळ
Google CTA

मुंबई: अभिनेत्री-गायिका सोफिया हयातला टेलिव्हिजनवर आपण अनेकदा पाहिले असेल. ती सलमान खानच्या 'बिग बॉस सीझन 7' या रिॲलिटी शोमध्येही दिसली होती. तिने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये काही वर्षे कामही केले आहे. ती स्वतःला आयपीएलची 'लकी मॅस्कॉट' मानते. अलीकडेच, तिचा एक पॉडकास्ट चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने आयपीएल आणि क्रिकेटपटू रोहित शर्माबद्दल अत्यंत बोल्ड भाष्य केले आहे.

रोहितबद्दल सोफियाचे खुलासे

सोफिया हयातने 'स्ट्रेट टॉक क्विअर विस्डम' या पॉडकास्टवर आयपीएलमधील तिच्या आयुष्याबद्दल सांगितले. तिने सांगितले की, तिला क्रिकेटबद्दल काहीही माहिती नव्हती. तिच्या मॅनेजरने तिला त्यासाठी भाग पाडले आणि त्या काळात तिने अनेकदा खोटंही बोलल्याचं मान्य केलं. सोफियाने तिचे वय खोटे सांगितले. असे केल्याने ती तरुणांची आयकॉन बनली आणि तिला भारतात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सोफियाने रोहित शर्मासोबत डेटिंग केल्याचा दावाही केला होता.

ती म्हणाली, "मी सर्वकालीन महान खेळाडू, रोहित शर्मासोबत डेटिंग केले, जो अजूनही जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. पण मला खेदाने सांगावेसे वाटते की, तो बेडवर चांगला नाही."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sofia Hayat (@thesofiahayat)

सोफिया हयातने रोहित शर्मासोबत डेटिंग केल्याचा दावा करण्याची ही पहिली वेळ नाही. काही वर्षांपूर्वी, तिने एका मुलाखतीत तिच्या आणि रोहितच्या डेटिंगच्या कथा सांगितल्या होत्या. ती एक पुस्तक लिहित होती, ज्यात तिने रोहितसोबतच्या तिच्या नात्यातील प्रत्येक पैलूचा समावेश करण्याचे वचन दिले होते. सोफियाने सांगितले की, तिने 2012 मध्ये रोहितसोबत डेटिंग सुरू केले आणि हे नाते एक वर्ष टिकले.