Crime News : सरकारी नोकरीसाठी आलेल्या एका तरुणीच्या हत्येने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अनीता नावाच्या तरुणीची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मूळची उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी असलेली अनीता झारखंडमधील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून कार्यरत होती. ती अवघ्या 15 दिवसांपूर्वीच झारखंडमधील चक्रधरपूर येथे आली होती आणि शीतला मंदिराजवळ भाड्याने राहू लागली होती.
ADVERTISEMENT
अनीता रक्ताच्या थारोळ्यात...
गुरुवारी (17 सप्टेंबर) या भाड्याच्या घरात एक तरुण संशयास्पदरीत्या आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. घरमालक संजय कुमार यांनी एका तरुणाला अनीताच्या खोलीत जाताना पाहिले. त्यांनी खोलीबाहेरच त्याला पकडून चौकशी केली असता, त्याने आपण अनीताचा प्रियकर असल्याचे सांगितले. यानंतर घरमालकाने खोलीत जाऊन पाहिले असता अनीता रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली. तिच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याच्या गंभीर खुणा होत्या. घरमालकाने तत्काळ त्या संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंना थेट 500 कोटींची मानहानीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?
प्रेमप्रकरणातून हत्या?
घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची ओळख उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी अनिल कुमार बिंद अशी झाली आहे. पोलीस प्राथमिक तपासात या हत्येचा संबंध प्रेमप्रकरणाशी जोडून पाहत आहेत. मात्र, अनिल अनीताच्या खोलीपर्यंत कसा पोहोचला, त्यांच्यात नेमके काय नाते होते आणि हत्येचे मूळ कारण काय, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करुन हत्या, कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके
मे महिन्यात नोकरी अन्...
या धक्कादायक घटनेमुळे महिला व बालविकास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सुन्न झाले आहेत. बीडीओ सोमनाथ यांनी सांगितले की, अनीताने याच वर्षी मे महिन्यात नोकरी जॉईन केली होती. नोकरी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही काळातच घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलीस आरोपी अनिलची कसून चौकशी करत असून तपासाअंतीच या हत्येमागील संपूर्ण सत्य आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












