शेजाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध, शेवटी नदीकाठी सडलेला मृतदेह सापडला

मुंबई तक

20 Sep 2026 (अपडेटेड: 20 Sep 2026, 12:00 PM)

Crime News : शेजाऱ्याच्या पत्नीसोबत कथित संबंधांच्या वादातून 31 वर्षीय अनिल राजगढ़ची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी हत्येत वापरलेला दाव जप्त केला आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेजाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध

point

शेवटी नदीकाठी सडलेला मृतदेह सापडला

Crime News : शेजाऱ्याच्या पत्नीसोबत कथित संबंध असल्याच्या वादातून 31 वर्षीय तरुणाची करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अनिल राजगढ़ असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. आसाममधील जोरहाट जिल्ह्यात ही घटना घडली. 

हे वाचलं का?

शेजाऱ्याच्या पत्नीसोबत असलेल्या कथित संबंधांवरून वाद

अधिकची माहिती अशी की, मृत अनिल 7 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मरियानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर 11 सप्टेंबर रोजी भोगदोई नदीजवळ नदीकाठच्या परिसरातून अनिलचा सडलेला मृतदेह सापडला. अनिल जोरहाटच्या मरियानी परिसरातील ग्रीनव्ह्यू टी इस्टेटमध्ये राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, शेजाऱ्याच्या पत्नीसोबत असलेल्या कथित संबंधांवरून हा वाद निर्माण झाला होता.

अनिमाने अनिलला चहाच्या मळ्याच्या परिसरात बोलावल्याचा आरोप

या प्रकरणात पोलिसांनी कपिल कर्मकार, त्याची पत्नी अनिमा कर्मकार, कपिलचा धाकटा भाऊ संजीत कर्मकार आणि त्यांचा मित्र महेश राजगढ़ यांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनिल गेल्या काही महिन्यांपासून अनिमाच्या संपर्कात होता. 7 सप्टेंबर रोजी अनिमाने अनिलला चहाच्या मळ्याच्या परिसरात बोलावल्याचा आरोप आहे. तेथे कपिल आणि अन्य आरोपी आधीच उपस्थित होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिमाने कथितपणे धारदार ब्लेडने अनिलवर हल्ला केला. त्यानंतर कपिल, संजीत आणि महेशही हल्ल्यात सहभागी झाल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धारदार दाव्याने अनिलचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले.

हत्येनंतर आरोपींनी अनिलचा मृतदेह एका पोत्यात ठेवला आणि तो ओढत नदीकाठच्या परिसरात नेऊन तेथे पुरल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपीच्या घरातून कथितपणे हत्येसाठी वापरलेला दाव जप्त केला. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात BNS मधील हत्येसह गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याशी संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यातील कथित भूमिका मान्य केली आहे. अनिलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.