नांदेड: किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या मुलीला रस्त्यात गाठलं, नंतर केलं लैंगिक शोषण
Nanded Crime News : नांदेड शहरात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेडमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार
शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
Nanded Crime News : कुवरचंद मंडले - नांदेड शहरात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आहे. आरोपीची आदिनाथ जाधव ( वय 28) अशी ओळख समोर आली. ही घटना नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे परिसरातील आहे. या प्रकरणी आरोपी आदिनाथ जाधववर पॉक्सो कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं नांदेड शहर हादरून गेल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : लातूर: संस्थाचालकाची सुसाईड नोट आली समोर, नेमकं चिठ्ठीत काय?
नांदेडमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे परिसरात हमालपुरा येथे मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, यादरम्यान आरोपी आदिनाथ जाधव (वय 28) याने पीडितेला रस्त्यात गाठलं होतं, नंतर एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेची माहिती पीडितेच्या आईला समजताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी नराधमाविरोधात तक्रार दाखल केली.
शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
आईच्या तक्रारीनुसार, मुलीवर आरोपी आदिनाथ जाधवने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेसा वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा : बायकोवर अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने पत्नीवर हल्ला करत धडापासून वेगळं केलं डोकं
दरम्यान, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक पुरी यांनी सांगितलं की, पीडितेच्या पालकांकडून सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. अशातच संबंधित प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी करत आहेत.
