Crime News : उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्योती नावाच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केलीय. तरुणीचा गळा दाबून तिला संपवण्यात आले. त्याने आपल्या भावाच्याच मेहुणीसोबत विवाह करायचा होता. आपले प्रेमप्रकरण इतरांना कळून नये या भीतीने ज्योतीपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने असे कृत्य होता. गंभीर बाब अशी की, या कृत्यात तरुणाच्या आईची देखील साथ होती. अशातच दोघेही आरोपी आई-तरुण पोलीस ठाण्यात आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : बुध आणि शुक्र ग्रहाचा संयोग, 'या' राशींसाठी चांगले दिवस येणार
गळा दाबून तरुणीची हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर 2026 रोजी सहारनपुर जिल्ह्यातील साखन नहर येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आळा होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यादरम्यान, शवविच्छेदनानंतर हा मृतदेह ज्योतीचा असल्याचे उघडकीस आले. अहवालातून प्रेयसीचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.
नात्याआड येत होती प्रेयसी
18 सप्टेंबर रोजी सहारनपुर प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले. पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास केला होता. दोघांमध्ये सर्व काही चांगलेच सुरू होते, मात्र अशातच काही दिवसांपासून मोहित भावाच्या मेहुणीवर डोळा ठेऊ लागला. तो तिच्यासोबत लग्न देखील करणार होता. मात्र ज्योती नात्याआड येत होती.
हे ही वाचा : शेजाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध, शेवटी नदीकाठी सडलेला मृतदेह सापडला
तक्रारीनुसार 15 सप्टेंबर रोजी रात्री मोहितने ज्योतीला भेटण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. तिचा मोबाईल फोन स्विच ऑफ केला आणि गळा दाबून तिला संपवलं. यानंतर मृतदेहाची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी तरुणाची आई ओमवती देखील या कटात सामील होती. दोघांनी मृतदेह गाडीवर पकडून दहा फूटावर नेऊन त्याची व्हिलेवाट लावली. या प्रकरणात आई आणि मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT












