Govt Jobs : 12 वी उत्तीर्णांसाठी 2536 जागांची भरती, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नकाच!
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
12 वी उत्तीर्णांसाठी 2536 जागांची भरती
सरकारी नोकरीची ही संधी सोडू नकाच!
SSC Recruitment : केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 'कंबाइंड हायर सेकंडरी (10+2) लेव्हल परीक्षा 2026' ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये सुमारे 2536 अंदाजित जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 'A' यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 सप्टेंबर पासून सुरू झाली असून अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असणाऱ्या केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. शासकीय सेवेत प्रवेश करण्याची आणि चांगल्या वेतनश्रेणीवर काम करण्याची ही 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी मानली जात आहे.
हे ही वाचा : कल्याण : पतीसोबतचा वाद मिटवतो, बहाणा करुन बोलावलं अन् भाजप नेत्याकडून अत्याचार
पात्रतेचे निकष
शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय, SSC आणि संस्कृती मंत्रालयातील डेटा एंट्री ऑपरेटर (DEO/DEO Grade 'A') या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून गणित विषयासह विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तर इतर सर्व मंत्रालये व विभागांमधील एलडीसी, जेएसए आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी कोणत्याही शाखेतून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
हे ही वाचा : नाशिक : कुत्र्यांना पोत्यात घालून आणलं अन् मुख्याधिकाऱ्याच्या टेबलवर सोडलं! VIDEO
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना पदानुसार 7 व्या वेतन आयोगाच्या श्रेणीनुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) आणि ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA) या पदांसाठी पे लेव्हल-2 (रुपये 19,900 ते 63,200) नुसार वेतन मिळेल. तर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 'A' साठी पे लेव्हल-4 (रुपये 25,500 ते 81,100) आणि सामान्य डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) साठी पे लेव्हल-4 तसेच पे लेव्हल-5 (रुपये 29,200 ते 92,300) नुसार वेतन श्रेणी लागू असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
