नाशिक : कुत्र्यांना पोत्यात घालून आणलं अन् मुख्याधिकाऱ्याच्या टेबलवर सोडलं! VIDEO
Niphad Stray Dog Protest : निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. विक्रम रंधावे यांनी झोळीत कुत्रा आणून मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडला आणि नोटांची माळ घालून प्रशासनावर सवाल उपस्थित केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशिक : कुत्र्यांना पोत्यात घालून आणलं अन्
मुख्याधिकाऱ्याच्या टेबलवर सोडलं! VIDEO
Niphad Stray Dog Protest : नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते विक्रम रंधावे झोळीत भटक्या कुत्र्यांना घेऊन नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी झोळी उघडून कुत्र्याला थेट मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडलं. यावेळी उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. या आंदोलनातून भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा : सांगली पटवर्धन घराण्याच्या वारशाचा वाद पेटला, मैनै प्यार किया फेम भाग्यश्रीने काय केलं?
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप
रंधावे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. निफाड शहर आणि आसपासच्या परिसरात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. वाहनचालकांनाही आवारा कुत्र्यांमुळे भीतीच्या वातावरणात रस्त्यावरून जावं लागत असल्याचा दावा करण्यात आला. अनेक नागरिकांना आवारा कुत्र्यांनी चावा घेतल्याचाही दावा रंधावे यांनी केला. या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असून नगरपंचायतीला लेखी निवेदनही देण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र, समस्या कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा : Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्मिती, 'या' राशींचा आजचा दिवस शुभ
