शाळेत प्रियकराने शिक्षिकेवर केला गोळीबार, नंतर स्वत:ला देखील संपवलं

मुंबई तक

• 01:46 PM • 22 Sep 2026

Crime News : एका शाळेत शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे. तसेच ज्या व्यक्तीने हत्या केली त्याने नंतर स्वत:वर गोळीबार करत जीवन संपवले आहे, नंतर या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षिका आणि तरुणाचे एकमेकांचे प्रेमसंबंध 

point

आरोपीने शिक्षिकेवर केला गोळीबार

point

नंतर स्वत:ला देखील संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील लखीमापूर खीरी जिल्ह्यातून एका शाळेत शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे. तसेच ज्या व्यक्तीने हत्या केली त्याने नंतर स्वत:वर गोळीबार करत जीवन संपवले आहे. मृत महिला शिक्षिकेची निशात फतिमा अशी ओळख समोर आली आहे. तसेच ज्याने शिक्षिकेवर गोळीबार करत तिची हत्या केली अशा आरोपीची सऊद अंसारी अशी ओळख समोर आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : पितृपक्षादरम्यान लक्ष्मी नारायण राजयोग, 4 राशींवर धनाचा वर्षाव

शिक्षिका आणि तरुणाचे एकमेकांचे प्रेमसंबंध 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला शिक्षिका निशात फातिमाला फरफटत शाळेच्या पहिल्या मजल्यावर नेले होते. फुटेजमध्ये आरोपीने महिला शिक्षिकेला पकडलेलं दिसून येत आहे. घटनेनंतर कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला आहे. तपासातून समोर आले की, दोघांचेही एकमेकांसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या मृत्यूच्या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय घडलं? 

या प्रकरणाती सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये निशात फातिमाला फरफटत पहिल्या मजल्यावर घेऊन गेला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असून इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या घटनेचा संपूर्ण क्रम उलगडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. 

हे ही वाचा : छळ की AI कॉपी ? वर्गात टॉपर तरी साहिल वाकोडेने आत्महत्या का केली?

गोळीबार झाल्यानंतर आवाज ऐकू येताच शाळेच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घडलेल्या घटनेनं मुले आणि कर्मचारी भयभीत झाले होते. काही काळ शाळेत भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.