नवी मुंबई: कोर्टाने शिक्षा सुनावताच आरोपींनी मारली पाचव्या मजल्यावरून उडी, नागेशच्या मृत्यूने खळबळ

रोहित गोळे

• 07:34 PM • 23 Nov 2026

नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर नागेश बाबू लाड याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या नागेशला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

belapur court accused jumps fifth floor after life imprisonment sentence navi mumbai

Belapur Court Accused Death

Google CTA

नवी मुंबई: नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात हत्या प्रकरणातील निकालानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नागेश बाबू लाड (वय अंदाजे 30 ते 35 वर्षे) असे मृत आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

हे वाचलं का?

2019 मध्ये हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश बाबू लाड याला 2019 मध्ये नेरुळ पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर आरोप होते. अटकेनंतर या खटल्याची सुनावणी बेलापूर न्यायालयात सुरू होती.

हे ही वाचा>> लातूर प्रेम प्रकरण : अल्पवयीन मुलीचं अपहरण, आरोपीचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू

सात वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निकाल

या प्रकरणाची सुनावणी गेल्या सात वर्षांपासून बेलापूर न्यायालयात सुरू होती. सोमवारी या खटल्याचा निकाल लागला. न्यायाधीश प्रसन्ना चांदगुडे यांच्या न्यायालयाने नागेश बाबू लाड याला दोषी ठरवले. त्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालानंतर न्यायालयातील पुढील प्रक्रिया सुरू असतानाच ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा>> 17 सेकंदात ठेचला चेहरा, जिम ट्रेनरची निर्घृण हत्या, नेमका वाद काय?

शिक्षा ऐकल्यानंतर न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी

जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर नागेश निराश झाल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. उंचावरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर जखमी नागेशला तातडीने मदत देत नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपोलो रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

नागेश बाबू लाड याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर घडलेल्या या घटनेचा दुर्दैवी शेवट झाला. 2019 पासून सुरू असलेल्या हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर न्यायालय परिसरात घडलेल्या या प्रकाराने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.