Dombivali Crime News : डोंबिवलीत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच नवऱ्याने पत्नी मित्र -मेत्रीणींसोबत गणपती बाप्पााच्या दर्शनाला गेली म्हणून मारहाण करण्यात आली. नवऱ्याने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आहे. संतोष पेटेकर अशी आरोपीची ओळख समोर आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी आता आरोपीला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेनं डोंबिवलीतील विष्णूनगर परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मीरा भाईंदर: डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड, मनसे आक्रमक
पतीचा बायकोवर भलताच संशय
घडलेल्या घटनेनुसार, 2009 मध्ये ज्योती यांचा संतोष पेटेकरसोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर पती आपल्याच पत्नीवर संशय घेऊ लागला होता. यातून त्यांच्यात सतत वाद होऊ लागला होता. या सततच्या त्रासाला कंटाळून 2020 मध्ये ज्योती आपल्या चार मुलांसह पतीपासून वेगळी राहू लागली होती. स्वत: कष्ट करून चारही मुलांचा सांभाळ करत होती. दरम्यान, पती-पत्नीतील वादामुळे ते दोघेही अधिकृतरित्या विभक्त होणार होते. न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू होती. मात्र आरोपीकडून त्रास हा सुरूच होता.
मित्र -मैत्रिणीसोबत गणपतीच्या दर्शनासाठी गेल्याने नवऱ्याने चाकूने केला हल्ला
मित्र -मैत्रिणीसोबत गणपतीच्या दर्शनासाठी गेल्याने नवऱ्याने तिच्या राहत्या घरी जाऊन तिच्यावर हात उचलला. मित्रांसोबत फिरायला का गेली? असा प्रश्न केला होता. त्याने चाकूने पत्नीवर वार केले अशी माहिती पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी दिली. आरोपीने ज्योती यांच्या छातीवर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यानंतर ज्योती ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
हे ही वाचा : अल्पवयीन खेळाडूवर लैंगिक अत्याचार, सायकलिंग प्रशिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आरोपी नवऱ्याला अटक
आईवर हल्ला होत असल्याचे पाहून चारही मुलांना धाव घेतलीच. आजी आणि मावशीकडे जाऊन मदतीसाठी आरडाओरड केली. मुलांचा आवाज ऐकून नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या हल्ल्यात ज्योती यांच्या बहिणीला आरोपीने मारहाण केली. ज्योतीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत, सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संतोष पेटेकर याला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ADVERTISEMENT












