'आपण लवकरच लग्न करुया...' CISF जवानाने केलं शिक्षिकेचं लैंगिक शोषण

मुंबई तक

19 Jul 2026 (अपडेटेड: 19 Jul 2026, 11:53 AM)

एका शिक्षिकेने CISF जवानावर लग्नाच्या आमिषाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच खाजगी क्षणांचे व्हिडिओदेखील रेकॉर्ड केल्याचं तिनं सांगितलं. बिहारच्या बेगुसरायमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'आपण लवकरच लग्न करुया...'

point

CISF जवानाने केलं शिक्षिकेचं लैंगिक शोषण

Crime News : एका शिक्षिकेने सीआईएसएफ (CISF) जवान मनजीत कुमार याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आणि नंतर लग्नास नकार दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी 13 जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले होते आणि ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचा साखरपुडाही झाला होता, असा दावा पीडितेने केला आहे. बिहारमधील बेगुसराय परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

वडिलांचे निधन अन् लग्नाला नकार

साखरपुड्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. शिक्षिकेचा असा आरोप आहे की, या काळात आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओही बनवले. या सर्व प्रकाराला तिने विरोध केला असता, आरोपीने लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून तिला शांत राहण्यास भाग पाडले. मात्र, काही काळाने पीडितेच्या वडिलांचे निधन झाले, ज्याचा फायदा घेत आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि दुसरीकडे लग्न ठरवले.

हे ही वाचा : पोलिसांनी उपोषणस्थळावरुन ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली पोस्ट, पत्नीमार्फत दिला मेसेज

पोलीस ठाण्याच्या आवारात कापली नस

आपल्यासोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला गेल्या दोन महिन्यांपासून अथमलगोला पोलीस ठाण्यात चकरा मारत होती, परंतु पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. या त्रासाला आणि पोलिसांच्या उदासीनतेला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या अर्जाच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जात असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

कुटुंबियांचा वेगळा दावा

दुसरीकडे, आरोपीचे मोठे भाऊ अमित कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, कुटुंबाला ही मुलगी पसंत नव्हती आणि ही बाब त्यांनी आधीच स्पष्ट केली होती. तरीही ती मुलगी त्यांच्या भावाशी संपर्क साधत होती आणि आता त्याचे दुसरीकडे लग्न ठरल्यामुळे ती सूडबुद्धीने खोटे आरोप करत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस सध्या दोन्ही बाजूंची तपासणी करत असून, तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.