Crime News : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या जनपदमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. सुनेनं आपल्या 67 वर्षीय सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकल्याची माहिती समोर आलेली आहे. सुनेनं धारदार शस्त्राने हल्ला करत सासऱ्याला जखमी केले. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी सासऱ्याला रूग्णालयात दाखल केले. हल्लेखोर महिलेला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : ऑगस्टमध्ये मंगळाचा मिथुन राशीत होणार प्रवेश, काही राशींचे भाग्य उजळेल
सुनेचा सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला
सांगण्यात येतंय की, जखमी झालेला सासरा आपल्या सुनेसोबत सतत गैरवर्तन करायचा. यामुळे सुनेनं सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. या हल्ल्यात सासरा गंभीर जखमी झाला होता. हे प्रकरण मुजफ्फरनगर येथील कोतवाली क्षेत्रातील सुफीपुर पट्टी परिसरातील आहे. हल्लेखोर महिलेची ओळख सैय्यदा (वय 23) आणि सासऱ्याची ओळख जाकिर (वय 67) अशी ओळख समोर आली. सुन सैय्यदाला दोन मुलं असून नवरा शहजाद हा हरियाणात ऑटोरिक्षा चालवण्याचे काम करतो.
सून सासऱ्याच्या गैरवर्तनाला वैतागली
शेजारी राहणाऱ्या मुलांचं म्हणणं असं आहे की, सैय्यदाला दोन लहान मुलं आहेत. पती शहजाद हरियाणातील एका भाडेतत्त्वावर रिक्षा चालवण्याचे काम करून उदरनिर्वाह करतो. पती बाहेर असल्याने ती आपल्या मुलांसह सासऱ्यासोबत राहायची. तिने सर्वांना सांगितलं की, तिचा सासरा तिच्यासोबत गैरवर्तन करतो. मात्र, कोणीच तिचं म्हणणं अगदी गंभीरतेनं घेतलं नाही.
हे ही वाचा : सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत गोपनीयता, वकिलांनाही भेटीची परवानगी नाकारली
या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळताच, संबंधित कलमांनुसार, गुन्हा दाखल करून या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












