टेकडीवरील वळणावर मुद्दाम बॅग पाडली, बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुलीसमोर नवऱ्याची हत्या

मुंबई तक

17 Jul 2026 (अपडेटेड: 17 Jul 2026, 04:13 PM)

Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये मंदिर दर्शनाच्या बहाण्याने 19 वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि दोन साथीदारांना अटक केली आहे.

Andhra Pradesh Crime News

Andhra Pradesh Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

टेकडीवरील वळणावर मुद्दाम बॅग पाडली

point

बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुलीसमोर नवऱ्याची हत्या

Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका मंदिर दर्शनाच्या प्रवासादरम्यान घडलेल्या हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडूतील रहिवासी असलेला 23 वर्षीय रमेशची त्याच्या पत्नीकडून हत्या करण्यात आलीये. रमेशची पत्नी हसिनी आणि तिचा प्रियकर युगंधर यांनी मिळून हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईची खबर : 'बेस्ट'ची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, बीएमसीच्या महासभेत काय घडलं?

बालपणीचा मित्रासोबत प्रेमसंबंध, पतीचा काटा काढला 

दोन वर्षांपूर्वी रमेश आणि 19 वर्षीय हसिनी यांचा विवाह झाला होता. त्यांना एक लहान मुलगीही आहे. मात्र, पोलिस तपासात हसिनीचे बालपणीचा मित्र असलेल्या 20 वर्षीय युगंधरसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या दोघांनी मिळून रमेशला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीला बट्टा! 48 वर्षीय महिलेवर पीएसआयने केला बलात्कार

पोलिसांच्या माहितीनुसार, हसिनीने रमेशला श्री मल्लेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर रमेश पत्नी आणि लहान मुलीला घेऊन दुचाकीवरून मल्लप्पा कोंडा टेकडीवरील मंदिराकडे निघाला. मात्र, प्रवासादरम्यान हसिनी मोबाईलवरून त्यांच्या हालचाली आणि नेमके ठिकाण प्रियकर युगंधरला सतत कळवत होती. या माहितीच्या आधारे युगंधर आणि त्याचे साथीदार टेकडीवरील तिसऱ्या हेअरपिन वळणाजवळ आधीच दबा धरून बसले होते.

मुद्दाम आपली बॅग रस्त्यावर फेकल्याचा आरोप

याच ठिकाणी हसिनीने मुद्दाम आपली हँडबॅग रस्त्यावर फेकल्याचा आरोप आहे. रमेश बॅग उचलण्यासाठी दुचाकी थांबवताच युगंधर आणि त्याचे साथीदार समोर आले. हल्लेखोरांना पाहून रमेशने जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलाकडे धाव घेतली. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार करत हत्या केली. ही संपूर्ण घटना त्यांच्या लहान मुलीसमोर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

रात्री उशिरापर्यंत रमेश, हसिनी आणि त्यांची मुलगी घरी न परतल्याने हसिनीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान मंदिर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रमेश पत्नी आणि मुलीसह मंदिराकडे जाताना दिसला. मात्र, पुढील फुटेजमध्ये हसिनी रमेशची दुचाकी घेऊन दोन पुरुषांसोबत परतताना दिसली. त्यानंतर मोबाईल कॉल रेकॉर्ड, जीपीएस लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी जंगलातून रमेशचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणात हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात आली असून, हसिनीचा विवाह दोन वर्षांपूर्वी अल्पवयात झाला होता का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.