Crime News : कर्नाटकातील बंटवाल येथील एका बस स्थानकावर हादरवून टाकणारी घटना घडली. गुरुवारी (16 जुलै) संध्याकाळी 21 वर्षांच्या एका तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना लोकांच्या देखत घडली असून, कॅमेऱ्यांमध्ये देखील कैद झाली आहे. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संशयित आरोपी तिथून पसार होण्यात यशस्वी झाला. या थरारक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
बसस्थानकावर रंगला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या असे मृत तरुणीचे नाव होते. लावण्या एका खाजगी नर्सिंग होममध्ये काम करत असे. गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बस स्थानकावर नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. नेमक्या याच वेळी आरोपीने तिच्यावर हल्ला करण्याचे पूर्वनियोजित कट रचून तिथे प्रवेश केला.
हे ही वाचा : टेकडीवरील वळणावर मुद्दाम बॅग पाडली, बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुलीसमोर नवऱ्याची हत्या
कोयत्याने सपासप वार
प्राथमिक तपासानुसार, आरोपीची ओळख चेतन म्हणून झाली आहे. तो आपल्यासोबत एक बॅग घेऊन आला होता, ज्यातून त्याने अचानक कोयता बाहेर काढला. चेतनच्या हातात शस्त्र पाहताच लावण्यने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, नराधम चेतनने तिचा बस स्थानकावरच पाठलाग केला आणि तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. लावण्य रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर तो वापरलेला कोयता तिथेच टाकून घटनास्थळावरून पळून गेला.
हे ही वाचा : भयंकर! चिमुकली शाळेत जाण्यासाठी थांबली, 6 भटके कुत्रे आले अन्..VIDEO
उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेत गंभीर जखमी लावण्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. या हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












