Crime News : ओडिशाच्या संबलपुर जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 24 वर्षीय तरुणीचे अपहरण करून प्रियकराने तिला जंगलात नेऊन तिची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह जंगलातून जप्त केला, नंतर शवविच्छेदनासाठी दिला असता, प्रकरण समोर आले. मृत तरुणीची सरिता (वय 24) अशी ओळख समोर आली. महुलपाली ठाणे क्षेत्रातील कुसुमी महुलागुडा गावातील रहिवासी होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'मला मोर्चात सहभागी व्हायचंय, डिस्चार्ज द्या', वांगचुक यांचं पत्र
रथयात्रेतून तरुणीला किडनॅप करत जंगलात नेलं
घडलेल्या घटनेनुसार, 16 जुलै रोजी कुचिंडा रथयात्रेदरम्यान सरिता अचानकपणे गायब झाली होती. अथक प्रयत्नाने शोध घेतल्यानंतरही तिचा पत्ता लागला नाही. अशातच कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात सरिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सरिताच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केलं की, अनिल प्रुसेथला ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारीदरम्यान, आरोपीने आपली चूक मान्य केली. आरोपीने सांगितलं की, त्याने सरिताला एका कारमध्ये बसवून नेले आणि तिची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
आणखी एकाला अटक
पोलिसांनी जंगलातून सरिताचा मृतदेह ताब्यात घेतला, नंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपीच्या हत्येत वापरलेल्या स्कार्फची देखील माहिती दिली. पोलिसांनी संबंधित स्कार्फ ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणात अशोक किशन नावाच्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोप केला की, त्याने आरोपी आणि महिलेला त्याच्या गाडीतून घटनास्थळी पाठवले होते. त्याच्या भूमिकेचाही देखील तपास करण्यात आला.
हे ही वाचा : CJP Protest Live Update : अभिजीत दिपके यांनी उपोषण सोडलं, CJP चे नेते नड्डांच्या भेटीला
एसडीपीओ प्रदीप दास यांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमकं कारण समोर आले नाही. या हत्येमागील घटना कशी घडली? यामध्ये इतर आणखी काही लोकांना समावेश होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT












