'आईजवळ का झोपतोस..' लिव्ह-इन पार्टनरच्या चिमुरड्या मुलाची हत्या, 25 वर्षीय तरुण ताब्यात

मुंबई तक

• 09:22 AM • 23 Jul 2026

अंबरनाथमधील एका सात वर्षांच्या निष्पाप बालकाचा उपचारादरम्यान मुंबईतील केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या अमानुष मारहाणीत हा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'आईजवळ का झोपतोस..'

point

लिव्ह-इन पार्टनरच्या चिमुरड्या मुलाची हत्या

point

25 वर्षीय तरुण ताब्यात

Crime News : अंबरनाथमधील एका सात वर्षांच्या निष्पाप बालकाचा उपचारादरम्यान मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात मृत्यू झाला. आईच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या अमानुष मारहाणीत हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून, मुलाच्या मृत्यूनंतर आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

आईजवळ झोपत असल्याने 'अडथळा'

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पतीपासून वेगळे झाल्यानंतर ही महिला तिच्या या लहान मुलासह अंबरनाथ येथे आरोपीच्या घरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, तर तिची इतर दोन मोठी मुले वडिलांकडे राहत होती. मुलगा आईजवळ झोपत असल्याने आरोपीच्या मते तो त्यांच्या संबंधांमध्ये 'अडथळा' ठरत होता. याच कारणावरून जेव्हा महिला कामावर गेलेली असायची, तेव्हा आरोपी मुलाला सातत्याने शारीरिक त्रास आणि मारहाण करायचा. मुलाने याबद्दल आईकडे तक्रारही केली होती आणि तिने आरोपीला ताकीदही दिली होती, तरीही त्याचे अत्याचार सुरूच राहिले.

हे ही वाचा : पुणे हादरले, 23 वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या खुनाचा घेतला सूड; 28 वार करून हत्या, धक्कादायक उलगडा

केईएममध्ये दुर्दैवी मृत्यू

17 जुलै रोजी क्रूरतेचा कळस गाठत आरोपीने या निष्पाप बालकाला लाटण्याने आणि लाथांनी जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याला गंभीर अंतर्गत दुखापती झाल्या. मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला प्रथम उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात, नंतर सायन रुग्णालयात आणि अखेर मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात (ICU) उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा : मुंबईसह राज्यात पाऊस घालणार थैमान, कुठे रेड; तर कुठे यलो अलर्ट

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

घटनेनंतर आरोपीने अज्ञात व्यक्तींनी मुलाला मारहाण केल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळवला आणि कसून चौकशी केली असता त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास वेगाने सुरू आहे.