घरात झोपली होती 70 वर्षीय महिला, दोन शेजारी आले अन् घडलं भयानक

मुंबई तक

24 Jul 2026 (अपडेटेड: 24 Jul 2026, 02:06 PM)

एक 70 वर्षीय वृद्ध महिला घरात झोपलेली असताना दोन शेजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरात झोपली होती 70 वर्षीय महिला

point

दोन शेजारी आले अन् घडलं भयानक

Crime News : एक 70 वर्षीय वृद्ध महिला घरात झोपलेली असताना तिच्याच दोन शेजाऱ्यांनी आत घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 जुलैच्या रात्री 10:30 च्या सुमारास ही भीषण घटना घडली. पीडित महिला आपल्या खोलीत झोपलेली असताना आरोपी घरात घुसले आणि त्यांनी हे कृत्य केले. महिलेचा आक्रोश ऐकून तिच्या मुलाला जाग आली, मात्र तो तिथे पोहोचेपर्यंत दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

दोन शेजारी ताब्यात

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मोरध्वज आणि बच्चू या दोन आरोपींची ओळख पटवली. तक्रारीनुसार मुख्य आरोपीने महिलेवर अत्याचार केला, तर दुसऱ्या आरोपीने त्याला या गुन्ह्यात मदत केली. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांच्या आत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

हे ही वाचा : पत्नी आणि तिचा प्रियकर मला मारून टाकतील; तरुण पोलिसांकडे पोहोचला अन्...

पीडितेची वैद्यकीय तपासणी

तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून वैज्ञानिक पुरावे गोळा केले. यासोबतच पीडित वृद्धेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा न्यायालयीन जबाबही नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे पीडितेच्या घराशेजारीच राहणारे असून, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हे ही वाचा : दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा, राहुल गांधी भडकले

फास्ट-ट्रॅकमध्ये प्रकरण चालणार

पोलिस अधिकारी जोगिंदर सिंग राजावत यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण केला जाईल असे स्पष्ट केले. पीडित वृद्धेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.