दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा, राहुल गांधी भडकले

मुंबई तक

दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनापासून दूर राहण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे. मात्र या निर्णयावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे.

ADVERTISEMENT

Delhi University On Student Protest 
Delhi University On Student Protest 
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा,

point

राहुल गांधी भडकले

Delhi University On Student Protest : जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाची लाट देशभरात पोहोचली आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून अनेक विद्यार्थी दिल्लीत जमा झालेले असून शिक्षणमंत्र्यांचा राजीनाम घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे तर आंदोलन अधिक व्यापक झाल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनापासून दूर राहण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे. मात्र या निर्णयावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे.

दिल्ली विद्यापीठाचा इशारा

दिल्ली विद्यापीठाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, 'तुमची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृपया नोंद घ्या की, भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या निदर्शनांवर आणि जमावावर कडक नियमन केले जात आहे. त्यामुळे तेथे होणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर जमावावर किंवा निदर्शनांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा कृतींमुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर तसेच व्यावसायिक संधींवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यानुसार, सर्व विद्यार्थ्यांना जंतरमंतरपासून दूर राहण्याचे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला तसेच कायद्याच्या पालनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, सध्याची परिस्थिती चिघळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर तयार करून पसरवला जात आहे, त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.'

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कहर, 16 जिल्ह्यांवर आस्मानी संकट

राहुल गांधींची टीका

दिल्ली विद्यापीठाच्या या निर्णयाचा राहुल गांधींनी चांगलाच समाचार घेतला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्यांचे लोकशाही हक्क बजावल्याबद्दल धमकावण्याची तुमची हिंमत कशी झाली? कृपया लक्षात ठेवा, वेळ आल्यावर यासाठी तुम्हालाच जबाबदार धरले जाईल.'

हे ही वाचा : कॉक्रोच जनता पार्टी लाँच करणार वेबसाईट, आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन

सीजेपीचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, सीजेपीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच एक विशेष वेबसाईट लाँच करणार आहे. या वेबसाईटवर आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्जचे फोटो आणि व्हिडिओ आंदोलकांना अपलोड करता येतील. सीजेपी या सर्व पुराव्यांची सखोल पडताळणी करेल आणि लाठीचार्ज करणाऱ्या प्रत्येक पोलिसाची ओळख पटवून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करेल.