कॉक्रोच जनता पार्टी लाँच करणार वेबसाईट, आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन
दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनादरम्यान ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष लवकरच एक विशेष वेबसाईट लाँच करणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कॉक्रोच जनता पार्टी लाँच करणार वेबसाईट
आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन
CJP Press Conference : दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनादरम्यान ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सीजेपीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष लवकरच एक विशेष वेबसाईट लाँच करणार आहे. या वेबसाईटवर आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्जचे फोटो आणि व्हिडिओ नागरिकांना व कार्यकर्त्यांना अपलोड करता येतील. सीजेपी या सर्व पुराव्यांची सखोल पडताळणी करेल आणि लाठीचार्ज करणाऱ्या प्रत्येक पोलिसाची ओळख पटवून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करेल.
त्या पोलिसांविरोधात कायदेशीर लढा
प्रवक्त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जर पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली किंवा नकार दिला, तर पक्ष याप्रकरणी थेट न्यायालयात धाव घेईल. केवळ एफआयआर नोंदवून सीजेपी गप्प बसणार नाही, तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना थेट जेलमध्ये पाठवेपर्यंत कायदेशीर लढा सुरूच ठेवला जाईल, असा ठाम निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. दरम्यान, वाढता दबाव पाहता सरकारने दुपारी 12.30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे सीजेपीला संवादासाठी बोलावले आहे, मात्र या बैठकीत काही मुद्द्यांवर अजिबात तडजोड केली जाणार नाही, असे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम
या आंदोलनादरम्यान बोलताना पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायलाच हवा, या भूमिकेवर पक्ष ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच, या संपूर्ण घडामोडींवर प्रशासनाचे आणि राजकीय वर्तुळाचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा : रात्रपाळी करणाऱ्या नर्सने वृद्ध डॉक्टरचा केला गेम, नेमकं काय घडलं?
आड रात्री काय घडणार?
दिल्ली पोलीस आज रात्री कारवाई करू शकतात, अशा पसरणाऱ्या चर्चांवर उत्तर देताना अभिजित दिपके यांनी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. ते म्हणाले की, काही पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती आहे की हे आंदोलन त्यांच्याच मुलांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे अशळा पोलिसांकडूनच आम्हाला ही गोपनीय माहिती मिळाली आहे.
