पोलिसांच्या गाडीसमोर उभी ठाकली ती मुलगी आहे तरी कोण?
riya ahir police van video protest : शिवाजी पार्क आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवून आंदोलकांना सोडण्याची मागणी करणारी रिया अहीर कोण? जाणून घ्या तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागची संपूर्ण माहिती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलिसांच्या गाडीसमोर उभी ठाकली ती मुलगी आहे तरी कोण?
जाणून घ्या तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागची संपूर्ण माहिती.
riya ahir police van video protest : शिवाजी पार्क येथे बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून आंदोलकांना सोडण्याची मागणी करणारी 27 वर्षीय रिया अहिर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या रियाने पोलिसांची गाडी अडवून आंदोलकांना सोडण्याचा आग्रह धरला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या धाडसाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. आंदोलनाला जाण्यापूर्वीच तिने एक व्हिडिओ शेअर करून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर घडलेली घटना तिच्यासाठीही अनपेक्षित ठरली.
हेही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!
पोलिसांच्या गाडीसमोर उभी ठाकली ती मुलगी आहे तरी कोण?
रिया अहिर ही 27 वर्षीय मॉडेल, कलाकार, होस्ट आणि उद्योजिका आहे. तिचा 'रियासत' नावाचा लक्झरी ब्रँड असून सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. शिवाजी पार्ककडे जात असताना दादरमधील कोहिनूर स्क्वेअर परिसरात तिला आंदोलकांनी भरलेली पोलिसांची व्हॅन दिसली. तिच्या म्हणण्यानुसार, वाहन पूर्णपणे भरलेले होते आणि त्यामध्ये उभे राहण्यासही जागा नव्हती. ही परिस्थिती पाहून ती अस्वस्थ झाली. पोलिस आंदोलकांना विनाकारण घेऊन जात असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली आणि त्यानंतर तिने थेट पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : मोठी बातमीः PM मोदींच्या मध्यरात्रीच्या VIDEO नंतर काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी सोडलं आमरण उपोषण
