Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!
Abhijeet Dipke Protest: सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः NEET पेपर लीक प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं वळण मिळालं आहे. तब्बल 26 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर उपोषण मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी करत NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली. मात्र, या घडामोडींनंतरही आंदोलन पूर्णपणे थांबणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
अभिजीत दिपके यांची ठाम भूमिका
Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केलं की, सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवलं असलं तरी जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सोनम सरांनी 26 दिवसांचं उपोषण संपवल्याबद्दल आम्हाला दिलासा वाटतो. त्यांच्या असामान्य धैर्याबद्दल आणि त्यागाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं. त्यांचं आयुष्य देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.”
याचबरोबर त्यांनी स्पष्ट केलं की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत Cockroach Janta Party चे जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.
