तीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह, पण कोणी घेतला आक्षेप?
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे तीन सख्ख्या बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह
पण कोणी घेतला आक्षेप?
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील धोरिया गावात तीन सख्ख्या बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकरी रमेश यांच्या सरोज, सावित्री आणि संतोष या तीन मुलींनी चामुंडा मंदिरातील हवनवेदीसमोर अग्नीला साक्षी मानून फेरे घेतल्याचे, तरुणाने तिघींच्या मंगळसूत्र व सिंदूर विधी केल्याचे आणि त्यानंतर आशीर्वाद घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गेल्या बुधवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. त्यानंतर या चौघांनी आणखी एक रील शेअर करत हा विवाह खरा असल्याचा दावा केला, त्यामुळे या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : पार्थ पवारांचं लग्न होणार 'या' दिवशी, तारीख जाहीर होताच पार्थ-कायनातचे Exclusive फोटोही आले समोर
असा विवाह झालाच नाही, पुजाऱ्यांचा दावा; हिंदू संघटनांचीही नाराजी
या व्हिडिओमधील आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडिओमध्ये हसनपूर नगरपालिकेचे भाजपचे अध्यक्षही तीनही बहिणींसोबत दिसत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही महिलाही या रीलमध्ये दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे चामुंडा मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात असा कोणताही विवाह झाल्याचा स्पष्ट इन्कार केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : मोठी बातमीः PM मोदींच्या मध्यरात्रीच्या VIDEO नंतर काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी सोडलं आमरण उपोषण
