नालासोपारातील काकांना रशियन मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोड बोलून चांगलंच गंडवलं
Nalasopara crime : नालासोपारातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सोशल मीडियावर आपण रशियन मुलगी असल्याचं खोटं सांगून 56 वर्षीय व्यक्तिला तब्बल 7 लाख 38 हजार 500 रुपयांना फसवलं आहे. दिल्ली अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवल्याचे कारण सांगितले, नंतर संबंधित व्यक्तीला वेड्यात काढत लाखो रूपयांचा गंडा घातला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रशियन तरूणीनं चांगलंच गंडवलं
वेगवेगळ्या बँक खात्यात 7 लाख 38 हजार 500 रुपये
Nalasopara Crime : नालासोपारातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सोशल मीडियावर आपण रशियन मुलगी असल्याचं खोटं सांगून 56 वर्षीय व्यक्तिला तब्बल 7 लाख 38 हजार 500 रुपयांना फसवलं आहे. दिल्ली अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवल्याचे कारण सांगितले, नंतर संबंधित व्यक्तीला वेड्यात काढत लाखो रूपयांचा गंडा घातला. या घटनेची नालासोपारा शहरात चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा : राम मंदिरातील चोरीबाबत राहुल गांधींचं पीएम मोदींना पत्र, नेमंक काय म्हणाले?
रशियन तरूणीनं चांगलंच गंडवलं
घडलेल्या घटनेनुसार, हा धक्कादायक प्रकार 11 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांच्या सोशल मिडिया अंकाउंटवर एका अज्ञात महिलेनं संपर्क साधला होता. सुरूवातीला गोड गुलाबीने बोलून महिलेनं व्यक्तीचा विश्वास मिळवला. संवाद साधल्यानंतर तिने आपण रशियाहून भारतात आल्याची माहिती दिली होती. आपण दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्याचे सांगून व्यक्तीला चांगलं अडकवलं.
महिलेकडे असलेल्या महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रांमुळे दिल्ली विमानतळाच्या कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतलं. अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सुटण्यासाठी तिला पैशांची गरज होती, असं कारण सांगून तिने पैशांची मागणी केली. कस्टम कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण पैसे प्रामाणिकपणे परत दिले जातील, असे खोटं आश्वासन दिलं होते.
वेगवेगळ्या बँक खात्यात 7 लाख 38 हजार 500 रुपये
महिलेच्या बोलण्याला संबंधित व्यक्ती पूर्णपणे भाळली गेली. तिच्या बोलण्यावर त्या व्यक्तीने डोळे झाकून विश्वास ठेवला. तिच्या वेगवेगळ्या बँक अकाउंटवर 7 लाख 38 हजार 500 रुपये टप्प्याटप्प्याने दिले. पैसे ट्रान्सफर होताच, पुढील व्यक्तीने संपूर्ण संपर्क तोडला. सोशल मिडिया, फोन बंद करत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीची मोठी फसवणूक केली.
