मोठी बातमीः PM मोदींच्या मध्यरात्रीच्या VIDEO नंतर काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी सोडलं आमरण उपोषण
Sonam Wangchuk Hunger Strike Ends: NEET पेपर लीक आंदोलनादरम्यान 26 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण अखेर संपलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीकबाबत मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः NEET पेपर लीक आंदोलनादरम्यान 26 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचूक यांचं आमरण उपोषण अखेर संपलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीकबाबत मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
मोदींच्या व्हिडिओनंतर काही मिनिटांतच निर्णय
या घडामोडीतील सर्वात महत्त्वाचा योगायोग म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच मध्यरात्री व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर कायद्याची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवत असल्याची घोषणा केली. या दोन घटनांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा
