'अपयश चालेल, पण फसवणूक नाही'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया
Sachin Tendulkar on Student Protest: सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न आणि क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक भावनिक पत्र पोस्ट केले आहे. पाहा सचिनची पहिली प्रतिक्रिया काय.
ADVERTISEMENT

मुंबई: देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) एक भावनिक आणि संवेदना व्यक्त करणारं पत्र पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपासून दूर राहून सचिनने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज व्यक्त केली आहे. याशिवाय पत्रातून त्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेवर आधारित व्यवस्था उभी करण्याचं आवाहनही केलं आहे.
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया
सचिनने आपल्या पत्राची सुरुवात आपल्या वडिलांच्या आठवणीने केली आहे.
"माझे वडील प्राध्यापक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मला लहानपणी एक महत्त्वाचा धडा दिला होता 'अपयश स्वीकारता येते, पण फसवणूक कधीच स्वीकारता येत नाही. शॉर्टकट कधीही निवडू नका."
यानंतर सचिनने समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. त्याने म्हटले की,
''ज्या समाजात मेहनतीपेक्षा निकालाला अधिक महत्त्व दिले जाते, तिथे गुणवत्तेपेक्षा शॉर्टकटची संस्कृती वाढते. त्यामुळे मेहनतीला न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे.''
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत सचिन म्हणाला की,
