शरद पवारांचे तीन डाव आणि तिरकं राजकारण, गुंगावून टाकणारी अडीच घरांची दुडकी चाल!
Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कारण एकाच आठवड्यात त्यांनी 3 अशा व्यक्तींच्या भेटी घेतल्या आहेत की, त्यावरून पवारांच्या राजकारणाबाबत नेमका कुणालाही अंदाज लावता येत नाहीए.
ADVERTISEMENT

देवा झाले अवघे जन । दोष गुण हारपले
बरवे झाले बरवे झाले । चित्त धाले महालाभे
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगात एक अत्यंत गूढ पण तितकाच सुंदर विचारए. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाला कोणाच्याही गुण-दोषांचा भेद उरत नाही. त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसतो.
आता या ओवीचा आणि राजकारणाचा काय संबंध? असं तुम्ही म्हणाल.. पण तशीच अवस्था आता देशातील एका ज्येष्ठ नेत्याची झालीए का? असा प्रश्न अनेकांना सतावू लागलाय. ज्यांनी गेली अनेक दशकं आपल्या राजकारणाचा कुणालाही ठाव लागू दिला नाही त्याच शरद पवारांच्या सध्याच्या काही राजकीय चाली या प्रत्येकाला गुंगावून टाकणारेएत.
पवारांच्या प्रत्येक भेटीमागे प्रश्न असतो. प्रत्येक हालचालीमागे चर्चा असते आणि प्रत्येक शांततेमागे एक मोठं राजकारण दडलेलं असतं, अशी अनेकांची धारणा आहे. आता आठवड्याभरापूर्वीचीच गोष्ट पाहा ना... शरद पवारांनी सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काल दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन CJP च्या अभिजीत दिपकेंना पाठिंबा दिला. तर आज पवार साहेब थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. आता आठवडाभरातील या तीन घटनांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
