19 वर्षीय तरूणीचा लग्नास नकार, आरोपीने पोटासह पाठीवर वार करत संपवलं

मुंबई तक

Crime News : एका तरुणाने 19 वर्षीय तरूणीला लग्नाची मागणी केली. तरूणीने लग्नास नकार दिला. नंतर पीडितेनं तरुणाचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा आरोप आहे. तरुणाने तिच्या पीजीच्या खोलीत शिरून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली, नंतर घटनास्थळावरून फरार झाला असून परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपी तरूणीने तरूणीकडे केली लग्नाची मागणी

point

पीडितेचा लग्नास नकार

point

आरोपीवर वार करत संपवलं

Crime News : छत्तीसगढच्या भिलाईमध्ये एका तरुणाने 19 वर्षीय तरूणीला लग्नाची मागणी केली. तरूणीने लग्नास नकार दिला. नंतर पीडितेनं तरुणाचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा आरोप आहे. तरुणाने तिच्या पीजीच्या खोलीत शिरून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली, नंतर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : मुंबईत पोलिसांच्या व्हॅनमध्ये विद्यार्थी, तरूणानं बाहेरून कडी खोलली; Video व्हायरल

हे प्रकरण छत्तीसगढ दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील आहे. ती बेमेतरा येथील रहिवासी असून खुशी साहू ही भिलाईमध्ये पीजीमध्ये राहत होती. तिचे फार्मसीचे शिक्षण सुरू होते. दुर्ग एएसपी सिटी सुखनंदन राठोडने सांगितलं की, लोकेश्वर साहू (वय 24) बलौदाबाजार येथील रहिवासी असून तो तरूणीशी विवाह करू इच्छित होता. 

तरूणी आणि तरूण एकमेकांचे लांबचे नातेवाईक 

दोघेही पूर्वीपासून एकमेकांच्या ओळखीचे होते, ते एकमेकांचे लांबचे नातेवाईक देखील होते. तरूणीने लग्नाला नकार दिला असता, नंतर आरोपीला मोबाइवर ब्लॉक केलं. त्याच्याशी पूर्णपणे बोलणं बंद केलं. पोलिसांचं म्हणण असे की, मोबाइल फोन ब्लॅॉक केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या पीजी खोलीत शिरून तिची हत्या केली. 

तरूणाकडून पीडितेच्या पाठीवर आणि पोटावर सपासप वार

तपासातून समोर आले की, आरोपी हा सुरूवातीपासून चाकू घेऊन आला होता. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी दोन शर्ट आणि पँटच्या आतील बाजूल बरमुडा परिधान केला होता. खोलीत पोहोचल्यानंतर त्याने तरुणीचा गळा दाबला आणि नंतर चाकूने पाठीवर, पोटावर हातापायावर वार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, तो चार मिनिट खोलीत बंद होता आणि खूनानंतर घटनास्थळावरून फरार झाला.