DNA रिपोर्टने उलगडा, सख्खा भाऊ निघाला बाळाचा बाप, निर्दोष तरुणावरील गुन्हा कोर्टाने केला रद्द

मुंबई तक

high court : डीएनए अहवालात आरोपी निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उच्च न्यायालयाने बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणातील एफआयआर रद्द केली. न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

ADVERTISEMENT

high court
high court
Google CTA

बातम्या हायलाइट

point

DNA रिपोर्टने उलगडा, सख्खा भाऊ निघाला बाळाचा बाप

point

निर्दोष तरुणावरील गुन्हा कोर्टाने केला रद्द

high court : हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देत बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द केली आहे. न्यायमूर्ती राकेश कैंथला यांच्या एकलपीठाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले की, वैज्ञानिक पुराव्यांमधून आरोपी पूर्णपणे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले असल्यास त्याला फौजदारी खटल्याची मानसिक आणि कायदेशीर छळवणूक सहन करण्यास भाग पाडता येणार नाही. त्यामुळे संबंधित आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआर न्यायालयाने संपूर्णपणे रद्द केली.

हेही वाचा : कामावर निघालेल्या महिलेवर ऑफिस कॅबमध्ये बलात्कार, 23 वर्षीय ड्रायव्हरला अटक

बलात्कार केल्याचा आरोप, पण तरुण निर्दोष, भावानेच ठेवले संबंध 

या प्रकरणाची सुरुवात बिलासपूर जिल्ह्यात झाली होती. 2023 मध्ये बिलासपूर जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या जबाबाच्या आधारे आयुष नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), कलम 506 (जीवे मारण्याची धमकी) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीमध्ये संबंधित मुलीने 9 मार्च 2023 रोजी आयुषने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. या घटनेमुळे ती गर्भवती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला होता.

हेही वाचा : 'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!' अंजली दमानियांची स्फोटक चावडी