'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!' अंजली दमानियांची स्फोटक चावडी

मुंबई तक

anjali damania on congress : मुंबई तकच्या 'चावडी' कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नीट आंदोलन, केंद्र सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षांच्या सहभागावर भाष्य करताना काँग्रेसबाबत मोठं विधान केलं. "काँग्रेसविरुद्ध आंदोलन केलं, ती चूक होती का असं आता वाटू लागलं आहे," असे म्हणत त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची तुलना केली.

ADVERTISEMENT

anjali damania on congress
anjali damania on congress
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'काँग्रेसविरुध्द लढले ही चूक वाटते... काँग्रेस खरंच चांगली!'

point

अंजली दमानियांची स्फोटक चावडी

anjali damania on congress : मुंबई तकच्या 'चावडी' कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नीट आंदोलन, आंदोलनातील राजकीय पक्षांचा सहभाग आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत केलेलं वक्तव्य विशेष चर्चेचा विषय ठरलं. दमानिया म्हणाल्या की, या आंदोलनात विरोधी पक्षांनी उशिरा सहभाग घेतला. त्यांनी पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी होण्यात काहीच गैर नसल्याचं सांगताना त्यांनी आंदोलनात पक्षांचे झेंडे आणि राजकारण बाजूला ठेवून देशासाठी नागरिक म्हणून सहभागी व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. संसदेत प्रश्न मांडण्याची जबाबदारी विरोधी पक्षांची असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : पुणे हादरले, 23 वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या खुनाचा घेतला सूड; 28 वार करून हत्या, धक्कादायक उलगडा

"आपण काँग्रेसविरुद्ध लढलो, ती चूक तर नव्हती ना?"

राहुल गांधींच्या प्रतिमेचा उल्लेख करताना दमानिया म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत त्यांच्या प्रतिमेत सकारात्मक बदल झाला आहे. विविध उपक्रमांमुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली झाली होती. मात्र, नीट आंदोलनात त्यांनी सुरुवातीपासून उपस्थित राहायला हवं होतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसबाबत मोठं विधान करत, "ज्यांनी काँग्रेसविरुद्ध आंदोलन केलं, त्यांच्यापैकी मलाही आता असं वाटायला लागलं आहे की आपण काँग्रेसविरुद्ध लढलो, ती चूक तर नव्हती ना? काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते शिक्षित होते आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत होतं," असं म्हटलं. भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाशी तुलना करताना त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात बौद्धिक पातळी अधिक चांगली असल्याचं मत व्यक्त केलं.

हेही वाचा : 'आईजवळ का झोपतोस..' लिव्ह-इन पार्टनरच्या चिमुरड्या मुलाची हत्या, 25 वर्षीय तरुण ताब्यात

हे वाचलं का?