तरूणी तरूणासोबत कॅफेत, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं जीवन

मुंबई तक

Crime News : अल्पवयीन मुलीने मंगळवारी आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवलं. कुटुंबीयांनी आरोप केला की, तरुणी ही एका तरूणासोबत एका कॅफेत आढळून आली होती. त्यानंतर त्या तरूणीचे काही फोटो आणि व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद करण्यात आले होते, नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरूणी कॅफेत तरूणासोबत

point

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणीन संपवलं जीवन 

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेलीतील बिथरी चैनपुर परिसरातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवलं. कुटुंबीयांनी आरोप केला की, तरुणी ही एका तरूणासोबत एका कॅफेत आढळून आली होती. त्यानंतर त्या तरूणीचे काही फोटो आणि व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद करण्यात आले होते, नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. कुटुंबीयांचं म्हणणं असं की, पीडितेनं या घटनेनं नैराश्यात येऊन जीवन संपवलं. 

हे ही वाचा : मुंबईत पोलिसांच्या व्हॅनमध्ये विद्यार्थी, तरूणानं बाहेरून कडी खोलली; Video व्हायरल

तरूणी कॅफेत तरूणासोबत

घडलेल्या घटनेनुसार, मुलगी ही बरेलीच्या इज्जतनगर येथील ब्लू डायमंड कॅफेत पोहोचली होती. त्या तरुणासोबत इतर दोन मुले देखील होती. जेव्हा त्यांचा दुसरा साथीदार घटनास्थळी निगराणी करत होता. या घटनेची माहिती काही संघटनांना समजली असता, परिस्थिती बिघडून गेली. इतक्यातच मुलगी आणि तिच्यासोबत असलेले काही तरूण घटनास्थळावरून निघून गेले. याचदरम्यान मुलीचा आणि तरूणाचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. नंतर तोच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.  

मृत तरूणी एका क्लिनिकवर काम शिकवण्यासाठी जात होती. तिच्या नातेवाईकांनी आरोप केला की, क्लिनिकवर काम करण्यास जात होती. कुटुंबीयांचं म्हणणे असे की, क्लिनिकच्या मालकीनीशी संवाद साधला असता, तिने आपण क्लिनिकवर असल्याचं सांगितलं. मात्र, ती त्या ठिकाणी नव्हती, तिने सांगण्यापासून काहीतरी लपवून ठेवलं होतं. 

हे ही वाचा : पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणीन संपवलं जीवन 

कुटुंबीयांनी आरोप केला, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणी नैराश्यात गेली. मंगळवारी रात्री तिने घरात गळफास घेत जीवन संपवलं. बऱ्याच वेळानंतर खोलीचा दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांना भलताच संशय निर्माण झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडला होता. तेव्हा कुटुंबीयांना तरुणी लटकलेल्या स्वरुपात दिसून आली होती. कुटुंबीायांचा असा आरोप होता की, तरूणीने नैराश्यात येऊन जीवन संपवलं.