राहुल गांधींच्या घराबाहेर जबरदस्त ड्रामा, आता पोलिसांनी नेमकं केलं तरी काय?

मुंबई तक

Delhi Protest Rahul Gandhi  : दिल्लीत जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. चलो संसद या मोर्चात उपोषणकर्ते सोनम वांगचुक सामील होणार होते, मात्र त्यापूर्वी त्यांना पोलिसांनी उचलून नेले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आंदोलन चिघळले आहे. याचपार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्या निवासाबाहेर हाईव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. गांधी स्मृतिकडे जाणाऱ्या विरोधी खासदारांची पोलिसांनी बस अडवली आहे.  

ADVERTISEMENT

Delhi Protest Rahul Gandhi
Delhi Protest Rahul Gandhi
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधी यांच्या निवासाबाहेर हाईव्होल्टेज ड्रामा

point

दिल्लीत मोठ्या घडामोडी

Delhi Protest Rahul Gandhi : दिल्लीत जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. चलो संसद या मोर्चात उपोषणकर्ते सोनम वांगचुक सामील होणार होते, मात्र त्यापूर्वी त्यांना पोलिसांनी उचलून नेले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आंदोलन चिघळले आहे. याचपार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांच्या निवासाबाहेर हाईव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. गांधी स्मृतिकडे जाणाऱ्या विरोधी खासदारांची पोलिसांनी बस अडवली आहे.  

हे ही वाचा : शरद पवारांचे तीन डाव आणि तिरकं राजकारण, गुंगावून टाकणारी अडीच घरांची दुडकी चाल!

दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात रात्रीपर्यंत इंटरनेट बंद

अशातच आज 23 जुलै 2026 रोजी दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात रात्रीपर्यंत सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ केली जाणार आहे. तसेच याचदरम्यान इंटरनेट सेवा देखील बंद केली जाणार आहे. विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील आहेत. यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काही खासदार हे आंदोलनात उतरले आहेत. 

अशातच प्रियांका गांधी या बसमधील ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन पोहोचल्या होत्या. तेव्हा त्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसून आल्या. तेव्हा त्यांनी बस पुढे घेऊन जाण्यास सांगितली होती. राहुल गांधी हे बसमध्ये उभे होते त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी बस पुढे नेण्यास सांगितली असता, त्यांची गाडी पोलिसांनी रोखली होती, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. 

हे ही वाचा : पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर

'आम्ही गुंड किंवा गुन्हेगार आहोत का?'

अशातच काँग्रेस नेते संदीप दिक्षीत यांनी आज तक या माध्यमाशी बोलताना प्रश्न केला की, जे संसदेत जातात, ते गांधी स्मारकावर का जाऊ शकत नाहीत? विरोधी पक्षाचे खासदार जाणार असल्याचे सरकारला ठाऊक होते, तरीही त्यांनी संबंधित बसेस अडवल्या आहेत. हे अडथळे नेमके कशासाठी? आम्ही गुंड किंवा गुन्हेगार आहोत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.