पोलीस प्रशिक्षणार्थीवर कंडोम फेकलं, अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप

मुंबई तक

• 09:00 AM • 24 Jul 2026

Crime News : पोलीस प्रशिक्षणार्थीनं मारहाणीसह आपल्या अंगावर कंडोम फेकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. नंतर तिला ब्लॅकमेल करत गुप्तांगाचा व्हिडिओ देखील काढल्याचा आरोप पीडितेनं केला होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडित तरुणीच्या बॅचमेंटकडून तिचा मानसिक छळ 

point

पीडितेवर कंडोम पाकिटे फेकून, गैरवर्तन

Crime News : पोलीस प्रशिक्षणार्थीनं मारहाणीसह आपल्या अंगावर कंडोम फेकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. नंतर तिला ब्लॅकमेल करत गुप्तांगाचा व्हिडिओ देखील काढल्याचा आरोप पीडितेनं केला होता. हा लज्जास्पद प्रकार हैदराबाद येथील वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत घडला होता. पोलिसांनी आरोपी आयपीएस पीडित प्रशिक्षणार्थी तरुणीविरोधात कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हैदराबादमधील असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिर्डी: महिलेवर 22 वर्षीय तरूणीकडून चाकूने 16 वेळा वार, पीडितेचा रूग्णालयात मृत्यू

पीडित तरुणीच्या बॅचमेंटकडून तिचा मानसिक छळ 

देशातील सर्वात प्रतिष्ठित पोलीस प्रशिक्षण असलेल्या हैदराबाद येथील एसव्हीपीएनपीए येथून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पीडित तरूणीचा बॅचमेट उदय कृष्णा रेड्डी याने अनेक आठवड्यांपासून तिचा मानसिक छळ करण्यास सुरूवात केली होती. संबंधित प्रकरणाचा आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात आला होता. 

पीडितेवर कंडोम पाकिटे फेकून, गैरवर्तन

पोलिसांच्या तक्रारीनुसार, 23 जून रोजी हा छळ करण्यात आला होता. आरोपी उदय कृष्णा आने महिला अधिकाऱ्याला व्हॅट्सअॅपवर अश्लील मेसेज देखील पाठवण्यात आले. तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न देखील केला आणि गळ्याचा चाकू लावला होता. यानंतर आरोपीने पीडितेवर कंडोमची पाकिटे फेकली होती, दुसऱ्याच दिवशी तिच्याशी गैरवर्तन देखील केले होते. 

हे ही वाचा : Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ

महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, हैदराबाद पोलिसांनी आरोपी उदय कृष्णा विरोधात भारतीय दंड संहिताच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.