पत्नी आणि तिचा प्रियकर मला मारून टाकतील; तरुण पोलिसांकडे पोहोचला अन्...

मुंबई तक

24 Jul 2026 (अपडेटेड: 24 Jul 2026, 01:07 PM)

Crime News : मेरठमधील एका तरुणाने पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून जीवाला धोका असल्याचा आरोप करत पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नी आणि तिचा प्रियकर मला मारून टाकतील

point

तरुणाची पोलिसांकडे धाव

Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका तरुणाने आपल्या पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून जीवाला धोका असल्याचा आरोप करत पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. "माझी पत्नी आणि तिचा प्रियकर मिळून मला मारून टाकतील, अशी भीती वाटते," असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित तरुणाने पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला असून, दोघे मिळून त्याला संपवण्याचा कट रचत असल्याचेही त्याने म्हटले आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद

हे प्रकरण मेरठमधील सूर्योदय कॉलनीतील आहे. तक्रारदार तरुण एका फूड डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याचा विवाह 22 जून 2025 रोजी मेडिकल पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीसोबत झाला होता. हा प्रेमविवाह असल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र, लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरू झाले. पत्नी एका युवकाशी वारंवार फोनवर बोलत असल्याचा आरोप त्याने केला आहे. यावर आक्षेप घेतल्यानंतर पती-पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यानंतर पत्नी घर सोडून गेली असून, आता ती तिच्या कथित प्रियकरासोबत मिळून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

हेही वाचा : कॉक्रोच जनता पार्टी लाँच करणार वेबसाईट, आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन

पत्नीने विषारी पदार्थ पिऊन कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 

तक्रारदाराने आणखी आरोप करताना सांगितले की, पत्नीने विषारी पदार्थ पिऊन त्याच्या कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्याविरोधात हुंडाबळी व छळाचा गुन्हाही दाखल केला आहे. 14 जुलै रोजी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने त्याच्यासोबत मारहाण केल्याचाही दावा त्याने केला आहे. यानंतर १७ जुलै रोजी त्याने पत्नीला एका अज्ञात युवकासोबत दुचाकीवर जाताना पाहिले. त्यावेळी त्याने त्यांचा व्हिडिओही तयार केल्याचे सांगितले आहे. काही अंतरावर गेल्यानंतर त्या दुचाकीचा अपघात झाला आणि दोघेही तेथून पळून गेल्याचा दावा त्याने आपल्या तक्रारीत केला आहे.

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, त्याच्याविरोधात आधीपासूनच हुंडाबळीचा गुन्हा दाखल असल्यामुळे त्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी त्याची मागणी आहे. अलीकडील काळात पतींच्या हत्येच्या घटनांचा उल्लेख करत त्याने स्वतःच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, मेरठचे सीओ सिव्हिल लाईन विश्व ज्योती राय यांनी एका व्यक्तीने पत्नीविरोधात आरोप करत अर्ज दिल्याची पुष्टी केली आहे. पत्नी मारहाण करते आणि तिच्याकडून जीवाला धोका असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला असून, या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मेडिकल पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. चौकशीत जे तथ्य समोर येतील, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.