पत्नी आणि तिचा प्रियकर मला मारून टाकतील; तरुण पोलिसांकडे पोहोचला अन्...

मुंबई तक

Crime News : मेरठमधील एका तरुणाने पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून जीवाला धोका असल्याचा आरोप करत पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नी आणि तिचा प्रियकर मला मारून टाकतील

point

तरुणाची पोलिसांकडे धाव

Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका तरुणाने आपल्या पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडून जीवाला धोका असल्याचा आरोप करत पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. "माझी पत्नी आणि तिचा प्रियकर मिळून मला मारून टाकतील, अशी भीती वाटते," असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित तरुणाने पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला असून, दोघे मिळून त्याला संपवण्याचा कट रचत असल्याचेही त्याने म्हटले आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद

हे प्रकरण मेरठमधील सूर्योदय कॉलनीतील आहे. तक्रारदार तरुण एका फूड डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याचा विवाह 22 जून 2025 रोजी मेडिकल पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीसोबत झाला होता. हा प्रेमविवाह असल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र, लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरू झाले. पत्नी एका युवकाशी वारंवार फोनवर बोलत असल्याचा आरोप त्याने केला आहे. यावर आक्षेप घेतल्यानंतर पती-पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यानंतर पत्नी घर सोडून गेली असून, आता ती तिच्या कथित प्रियकरासोबत मिळून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

हेही वाचा : कॉक्रोच जनता पार्टी लाँच करणार वेबसाईट, आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन