Crime News : इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या रिल्स लाईक करण्यापासून सुरू झालेला संवाद एका अशा वळणावर येऊन ठेपला, ज्याने पोलीस प्रशासनालाही काही काळासाठी बुचकळ्यात टाकले. 4 मुलांची आई असलेल्या 40 वर्षीय महिलेचा 14 वर्षीय किशोरवयीन मुलावर जीव जडला. महिलेने दावा केला की त्यांनी लग्न केले आहे, मात्र आता तो मुलगा तिच्यासोबत राहण्यास नकार देत आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या मुलाशी महिलेने नाते जोडल्याचा दावा केला, तो मुलगा तिच्या स्वतःच्या मोठ्या मुलापेक्षाही पाच वर्षांनी लहान आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली ही मैत्री कालांतराने भावनिक नात्यात कशी बदलली आणि अखेर ती पोलीस ठाण्यापर्यंत कशी पोहोचली, याची चर्चा परिसरात सुरु झालीये.
ADVERTISEMENT
हेही वाचा : निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण पराभूत झाला, आता शिंदेंच्या निर्णयाने आनंद गगनात मावेना
तणावानंतर अखेर सामोपचाराने मिटला वाद
महिला मुळची गोरखपूरची रहिवासी असून ती आपल्या चार मुलांसह वास्तव्यास आहे. इन्स्टाग्रामवर रिल्सच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर त्यांच्यातील गप्पांचा ओघ वाढत गेला आणि त्याचे रूपांतर अजब अशा नात्यात झाले. ज्या मुलाचा उल्लेख या प्रकरणात केला जात आहे, तो आपल्या वडिलांसोबत चेन्नईमध्ये राहतो. महिलेचा आरोप होता की, त्या मुलाने तिच्याशी विवाह केला आहे, परंतु आता तो तिला सोडून देत आहे. महिलेने नौतनवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन जेव्हा हा सर्व प्रकार कथन केला, तेव्हा पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. प्रकरण अल्पवयीन मुलाशी संबंधित असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने दोन्ही बाजू समजून घेतल्या. मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी या आरोपांवर आपली भूमिका मांडली. प्रकरण वाढू नये आणि भविष्य खराब होऊ नये यासाठी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी आणि दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी महिलेची समजूत काढली.
हेही वाचा : चकण्याला आंबा हवा होता, पण त्याआधीच अल्पवयीन मुलाचा जीव गेला, काय घडलं?
संपर्क न ठेवण्याचे दोन्ही बाजूंनी केले मान्य
अखेर नौतनवा पोलीस ठाण्याचे प्रभारी बसंत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सुरुवातीला तक्रार दिली होती, परंतु नंतर तिने कोणतीही कायदेशीर कारवाई नको असे कळवले. दोन्ही बाजूकडील लोकांना समजावून सांगितल्यानंतर, भविष्यात एकमेकांशी कोणताही संपर्क न ठेवण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. यामुळे हा वाद सध्या सामोपचाराने मिटला आहे. सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी संवाद साधताना किती सावधगिरी बाळगावी, याचे हे एक विदारक उदाहरण ठरले आहे. ऑनलाइन ओळख आणि त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे नाते हे आता कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी पालकांना आणि नागरिकांना सोशल मीडियाच्या वापराबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा परिसरात घडली आहे.
ADVERTISEMENT











