गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला, निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!

मुंबई तक

29 May 2026 (अपडेटेड: 29 May 2026, 12:53 PM)

Honor Killing : प्रेमसंबंधांच्या वादातून वडिलांनी आणि दोन भावांनी मिळून आपल्या 18 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केली. मुलीच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची तयारी असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे भयानक हत्याकांड उघडकीस आणले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला

point

निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!

Crime News : एका 18 वर्षीय मुलीची तिच्याच वडिलांनी आणि सख्या भावांनी गळा आवळून हत्या केली आहे. क्रांती असे या मृत तरुणीचे नाव असून, तिचे गावातीलच एका दुसऱ्या धर्मातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच तरुणाशी लग्न करायचे होते, मात्र ही गोष्ट तिच्या घरच्यांना मान्य नव्हती. 24 मे रोजी तिचे वडील महेंद्र यांनी तिला प्रियकराशी फोनवर बोलताना पकडले होते. या रागाच्या भरात वडिलांनी तिचा मोबाईल हिरावून घेतला आणि तिची अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर काही दिवसांतच, मंगळवारी रात्री पिता महेंद्र आणि तिचे दोन भाऊ आकाश व अमन यांनी मिळून क्रांतीची गळा आवळून हत्या केली. रक्ताच्या नात्याचा विचार न करता त्यांनी आपल्याच मुलीच्या जीवनाचा अंत केला.

हे वाचलं का?

हेही वाचा : सांगली : रुग्णालयाचं ड्रेनेज तुंबल्याने सफाई, पण भयंकर दृश्य दिसलं अन् सगळे हादरले

अंत्यसंस्कारावेळी पोलिसांचा हस्तक्षेप; शवविच्छेदनातून सत्य उघड

हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी वडील महेंद्र यांनी संपूर्ण गावात क्रांतिचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा खोटा कांगावा केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, एका सतर्क ग्रामस्थाने या संशयास्पद मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिरौली पोलीस दलाने श्मशान घाटाकडे धाव घेतली आणि चिता पेटवण्यापूर्वीच मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी (पोस्टमॉर्टम) केली असता, आजारपणाचा हा सर्व खोटा बनाव उघडा पडला. क्रांतीचा मृत्यू आजारपणामुळे नसून गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या गळ्यावर मारहाणीच्या आणि दाबल्याच्या खोल खुणा सापडल्याने हे 'ऑनर किलिंग' असल्याचे सिद्ध झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथून उघडकीस आली आहे.

हेही वाचा : नवरा, सासूसह चौघांना क्रूरपणे संपवलं, नंतर रडण्याचं नाटक; 'ही' महिला का झाली निर्दयी?

प्रेमप्रकरणाच्या वादातून आपल्याच मुलीचा बळी

या प्रकरणी मृत मुलीच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलांसह दोन्ही भावांवर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिरौली पोलिसांनी तिन्ही आरोपींना त्वरित ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी अजय कुमार म्हणाले की, संदिग्ध मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. रक्ताच्या नात्यातील या क्रूरतेने संपूर्ण बरेली जिल्हा हादरून गेला आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून आपल्याच मुलीचा बळी घेणाऱ्या या नराधम वडिलांवर आणि भावांवर कडक कारवाईची मागणी आता परिसरातून केली जात आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करत असून, या हत्येशी संबंधित इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. ही संवेदनाशून्य घटना बरेली, उत्तर प्रदेश येथे घडली आहे.