Crime News : एका सख्या मामाने आपल्या 4 वर्षीय भाचीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीर उर्फ छोटू असे या आरोपी मामाचे नाव आहे. त्याने आपल्या भाचीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घरून सोबत नेले होते. काही वेळाने त्याने मुलीची हत्या करून मृतदेह एका कारखाली लपवून ठेवला आणि तो पसार झाला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
कारखाली सापडला चिमुरडीचा मृतदेह
शनिवारी (11 एप्रिल) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका कारखाली लहान मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. घटनेची गंभीरता ओळखून एसीपी अतुल कुमार सिंह यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी केली असता, मुलीच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या. प्राथमिक तपासात तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : पुणे हादरलं, PhD ची विद्यार्थिनी, गाईडकडून अत्याचार आणि बेडरुममध्ये सगळं संपलं...!
पोस्ट मार्टम अहवालात काय?
मृताची ओळख रहनुमा (वय 4) अशी पटली असून, ती शमशाद गार्डन, पसौंडा येथील रहिवासी होती. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जमील उर्फ छोटू याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून, त्या अहवालानंतरच हत्येचे नेमके कारण आणि मुलीवर अन्य काही अत्याचार झाले आहेत का, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा : अमरावतीत अश्लील व्हिडिओ कांड, 180 तरुणी आणि 350 'तसले' व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप, वातावरण तापलं
आरोपी मामा फरार
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
ADVERTISEMENT











