नागपूर : इयत्ता 9 वी असताना ओळख झाली, नराधमाने 3 वर्षात केलं भयंकर कांड

Nagpur Crime News: नागपूरमधील मानकापूर परिसरात 20 वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

Mumbai Tak

योगेश पांडे

30 May 2026 (अपडेटेड: 30 May 2026, 02:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : इयत्ता 9 वी असताना ओळख झाली

point

नराधमाने 3 वर्षात केलं भयंकर कांड

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय युवकाने 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. ही पीडित मुलगी इयत्ता 12 वीमध्ये  शिकणारी विद्यार्थिनी असून, काही दिवसांपूर्वी प्रकृती अचानक बिघडल्याने जेव्हा कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेव्हा ती गरोदर असल्याचे निदान झाले. या धक्कादायक खुलासाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नराधम आरोपीला पोलिसांनी त्वरित अटक केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 14 वर्षीय मुलावर 40 वर्षीय महिलेचा जीव जडला, इन्स्टा लाईकने बहरले प्रेम; शेवटी काय घडलं?

 मागील तीन वर्षांपासूनची ओळख, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

मिळालेल्या माहितीनुसार, या नराधम आरोपीची ओळख विवान खांडेकर (वय 20 वर्षे, रा. मानकापूर) अशी झाली आहे. विवान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण असून, त्याच्यावर यापूर्वी देखील मारामारीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांना मागील तीन वर्षांपासून ओळखत होते. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली, परंतु त्यानंतर आरोपीने हळूहळू तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित मुलीच्या घरीच तिच्यावर अनेक महिने शारीरिक अत्याचार केले.

हेही वाचा : जळगाव : प्रेमी युगुल लॉजवर गेलं, अन् एकाची बॉडी सापडली; असं घडलं तरी काय?

मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस 

नराधम विवानने केवळ मुलीच्या घरीच नाही, तर गोरेवाडा येथील एका हॉटेलमध्ये नेऊनही तिला लग्नाचे आणि नोकरी लागल्यानंतर संसार करण्याचे स्वप्न दाखवले. तिथेही त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच तिची शारीरिक स्थिती खालावली, तेव्हा नातेवाईकांनी तिच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनंतर नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी तक्रार मिळताच तत्परतेने कारवाई करत विवान खांडेकर याला ताब्यात घेतले आहे.

आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने अधिक सखोल तपास पोलीस करत आहेत.