भाजप नेता असल्याचा दावा, 16 वर्षीय मुलीवर 19 वेळा लैंगिक अत्याचार अन्...

Crime News : स्वत:ला बीजेपी सोशल मीडियाचा प्रभारी असल्याचा दावा कृष्णा पांडे नावाच्या तरुणाने केला होता. आता त्यानेच एका 16 वर्षीय पीडितेवर तब्बल 19 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तरुणीने लग्नाचे वचन देऊनच विद्यार्थिनीला प्रेमप्रकरणात ओढले, तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने तिला हॉटेलवर नेले. हॉटेलची खोली मिळवण्यासाठी त्याने आधारकार्डवरील खोटी जन्मतारीख दाखवली.

crime news

crime news

मुंबई तक

14 Apr 2026 (अपडेटेड: 14 Apr 2026, 08:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे आमिष दखवून पीडितेवर 19 वेळा लैंगिक अत्याचार 

point

कृष्णाच्या कुटुंबीयांकडून पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील नजीराबाद पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वत:ला बीजेपी सोशल मीडियाचा प्रभारी असल्याचा दावा कृष्णा पांडे नावाच्या तरुणाने केला होता. आता त्याच व्यक्तीने एका 16 वर्षीय पीडितेवर तब्बल 19 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तरुणीने लग्नाचे वचन देऊनच विद्यार्थिनीला प्रेमप्रकरणात ओढले, तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने तिला हॉटेलवर नेले. हॉटेलची खोली मिळवण्यासाठी त्याने आधारकार्डवरील खोटी जन्मतारीख दाखवली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावतीत अश्लील व्हिडिओ कांड, 180 तरुणी आणि 350 'तसले' व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप, वातावरण तापलं

लग्नाचे आमिष दखवून पीडितेवर 19 वेळा लैंगिक अत्याचार 

पीडितेच्या माहितीनुसार, कृष्णा पांडे तिला सोशल मीडियावर भेटला होता. त्याने सुरुवातीला लग्नाचे आमिष दखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने पहिल्याच भेटीत विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला. नंतर त्या व्हिडिओचा वापर करून तिला ब्लॅकमेल केले आणि 19 वेळा वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेऊन तिचा लैंगिक छळ केला. तिने याला विरोध केल्यास तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 

कृष्णाच्या कुटुंबीयांकडून पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी 

या एकूण घटनेची माहिती विद्यार्थिनीने तिच्या आईला सांगितली, तेव्हा पीडितेची आई आरोपीच्या घरी गेली. या प्रकरणात असा आरोप आहे की, कृष्णाचे वडील, भाऊ, आणि काका यांनी पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेची आई म्हणाली की, 'आम्ही त्यांना अनेकदा सांगितले पण, त्यांनी आमच्यावर नको तेच आरोप केले.' आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी व्यवस्थापक कृष्णा पांडे आणि इतर पाच जणांविरुद्ध फसवणूक, बनाव आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : प्रेमसंबंधातून नवऱ्याचे तुकडे, डिझेलनं जाळला मृतदेह अन् जेसीबीने शेतात पुरला, बायकोच्या प्रेमाचा रक्तरंजित थरार

आरोपीने भाजप नझीराबाद मंडळाचे सोशल मिडियाचे प्रभारी असल्याचा दावा केला. हे प्रकरण चिघळल्यानंतर भाजप शहराध्यक्ष अनिल दीक्षित यांनी सांगितलं की, तरुणाला पक्षातून काढून टाकले होते, तो सध्या भाजपचा सदस्य देखील नाही.