प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून अंगावर थेट ॲसिड ओतलं! तरुणाच्या मृत्यूनंतर प्रेयसीला जन्मठेप अन्...

प्रेमसंबंधातील विश्वासघात आणि वादामुळे प्रियकराची क्रूर हत्या करणाऱ्या सोनम पांडे हिला आगरा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (एडीजे 2) ने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तरुणाच्या मृत्यूनंतर प्रेयसीला जन्मठेप अन्...

तरुणाच्या मृत्यूनंतर प्रेयसीला जन्मठेप अन्...

मुंबई तक

• 09:00 AM • 08 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून अंगावर थेट ॲसिड ओतलं!

point

तरुणाच्या मृत्यूनंतर प्रेयसीला जन्मठेप अन्...

Crime News: प्रेमसंबंधातील विश्वासघात आणि वादामुळे प्रियकराची क्रूर हत्या करणाऱ्या सोनम पांडे हिला आगरा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (एडीजे 2) ने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षा आणखी वाढवली जाऊ शकते. हा गुन्हा 21 मार्च 2021 रोजी आग्रा जिल्ह्यातील हरिपर्वत पोलीस ठाण्याच्या खंदारी परिसरात घडला होता. 

हे वाचलं का?

पंखा ठीक करण्याच्या बहाण्याने घरी बोलवलं अन्... 

औरैया जिल्ह्यातील रहिवासी असलेली सोनम पांडे ही व्यावसायिक नर्स कासगंज येथील देवेंद्र नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंधात होती. मात्र, देवेंद्रचं दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्याची बातमी कळल्यानंतर सोनमने त्याला मार्गातून हटवण्याचा कट रचला. 21 मार्च 2021 रोजी तिने बिघडलेला पंखा ठीक करण्याच्या बहाण्याने देवेंद्रला आपल्या खोलीत बोलावलं. तिथे लग्नावरून त्यांच्यात मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात सोनमने देवेंद्रवर अॅसिड ओतलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई सेंट्रलला जोडणाऱ्या 'या' ब्रिजचं काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

प्रियकरावर अॅसिड ओतलं... 

या निर्दयी हल्ल्यात देवेंद्र गंभीररित्या जखमी झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूपूर्वी देवेंद्रने रुग्णालयात दिलेल्या जबाबात सोनमने त्याला हत्येच्या उद्देशाने घरी बोलवून त्याच्यावर अॅसिड फेकल्याची सत्य घटना उघडकीस आली आणि तरुणाचं हा जबाब प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा ठरला. 

हे ही वाचा: 15 तास ओलिस ठेवलं; विवस्त्र व्हिडिओ बनवला, महिलेनं कसं अडकवलं तरुणाला जाळ्यात?

पोलीस तपासादरम्यान सोनमच्या खोलीतून एक लीटर अॅसिडचा डबा जप्त करण्यात आला होता. हा डबा कोर्टात सादर करण्यात आला आणि तो निर्णायक पुरावा ठरला. विविध साक्षीदार, फॉरेन्सिक अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षी पुरावे सादर करण्यात आले. यातून हत्या ही पूर्वनियोजित, जाणीवपूर्वक आणि क्रूर असल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं. कोर्टाने या क्रूर कृत्याची दखल घेत सोनम पांडे हिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुरुवातीला या प्रकरणात सोनमला जामीन मिळाली होता, परंतु लांब सुनावणीनंतर ती दोषी ठरली आणि आता तिला आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

    follow whatsapp