गर्लफ्रेंडचा दुसऱ्याच तरुणाशी ठरला विवाह, बॉडीबिल्डर बॉयफ्रेंडला समजताच बंद खोलीतच... हादरवून टाकणारं प्रेम

मुंबई तक

08 Feb 2026 (अपडेटेड: 08 Feb 2026, 02:46 PM)

Suicide News : तरुणाने आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी विवाह झाल्याचे समजताच आत्महत्या करत जीवन संपवलं. किरण जो (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो बॉडीबिल्डर असून जीम ट्रेनिंगचं काम करायचा. शनिवारी तो मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असता, तिचे दुसऱ्याच तरुणाशी लग्न ठरले होते अशी माहिती समोर आली.

Suicide News

Suicide News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाने आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी विवाह झाल्याचे समजताच आत्महत्या केली

point

तरुण बॉडीबिल्डर असून जीम ट्रेनिंगचं काम करायचा

Suicide News : तरुणाने आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी विवाह झाल्याचे समजताच आत्महत्या करत जीवन संपवलं. किरण जो (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो बॉडीबिल्डर असून जीम ट्रेनिंगचं काम करायचा. शनिवारी तो मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असता, तिचे दुसऱ्याच तरुणाशी लग्न ठरले होते अशी माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 63 वर्षीय शिकवणी मास्तरांकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी राहिली गर्भवती

प्रेयसीचे  दुसऱ्याच तरुणाशी विवाह

आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी विवाह झाल्याचं समजताच त्याला त्रास होऊ लागला. त्याने आपली नाराजी व्यक्त करत तो महालक्ष्मी लेआउटमधील त्याच्या घरी परतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तरुणाने प्रेयसीसाठी संपवलं जीवन

तरुण किरण जो हा घरी आला आणि त्याला आपल्या प्रेयसीबाबतची माहिती समजताच त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. बराच वेळ तो बाहेर आला नाही, जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला होता. नंतर कुटुंबियांनी खोलीतून बाहेर मृतदेह काढला. 

हे ही वाचा : काही राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, 'या' राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

दरम्यान, संबंधित प्रकरणात किरणचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. नंतर किरणच्या खोलीत आढळून आलेल्या सुसाईड नोटसह या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.