63 वर्षीय शिकवणी मास्तरांकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी राहिली गर्भवती
Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी या नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 63 वर्षीय शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी आईवर पीडितेनं तक्रार दाखल करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षक आणि विद्यार्थी नातेसंबंधाला काळिमा
63 वर्षीय शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला
पोटात दुखत असल्याची मुलीकडून तक्रार
Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी या नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 63 वर्षीय शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी आईवर पीडितेनं तक्रार दाखल करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेत प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु केला.
हे ही वाचा : काही राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, 'या' राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार
नेमकं काय घडलं?
हे प्रकरण गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथील आहे. अल्पवयीन मुलगी एका शिक्षकाच्या घरी शिकवणीसाठी जात होती. शिक्षक विद्यार्थीनीला ट्यूशनसाठी बोलवायचा. त्याचदरम्यान आरोपी शिक्षिकेनं विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकाने गुन्हा केल्यानंतर मुलीला याबाबत कोणालाच काही सांगू नको अशी धमकी देखील दिली होती. यादरम्यान, आरोपी शिक्षिकेनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
कोणाला काहीही न सांगण्याची दिली धमकी
पोलीस तक्रारीत म्हटलं की, आरोपी शिक्षकाने गुन्हा केल्यानंतर मुलीला याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. शिकवणी शिक्षकाच्या क्रूर वर्तनामुळे घाबरलेल्या अवस्थेतील पीडितेनं घटनेबाबत कोणाला काहीही सांगितले नाही.
पोटात दुखत असल्याची मुलीकडून तक्रार
काही वेळानंतर मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. कुटुंबियांनी विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगण्यास नकार दिला होता. तिला एका महिला डॉक्टरकडे नेण्यात आले, तपासणीनंतर पीडित गर्भवती असल्याचे दिसून आले होते. संबंधित प्रकरणाची माहिती समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते भायभीत झाले.










