63 वर्षीय शिकवणी मास्तरांकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी राहिली गर्भवती

मुंबई तक

• 02:06 PM • 08 Feb 2026

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी या नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 63 वर्षीय शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी आईवर पीडितेनं तक्रार दाखल करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षक आणि विद्यार्थी नातेसंबंधाला काळिमा

point

63 वर्षीय शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला

point

पोटात दुखत असल्याची मुलीकडून तक्रार

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी या नातेसंबंधाला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 63 वर्षीय शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी आईवर पीडितेनं तक्रार दाखल करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेत प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : काही राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, 'या' राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

नेमकं काय घडलं? 

हे प्रकरण गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथील आहे. अल्पवयीन मुलगी एका शिक्षकाच्या घरी शिकवणीसाठी जात होती. शिक्षक विद्यार्थीनीला ट्यूशनसाठी बोलवायचा. त्याचदरम्यान आरोपी शिक्षिकेनं विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकाने गुन्हा केल्यानंतर मुलीला याबाबत कोणालाच काही सांगू नको अशी धमकी देखील दिली होती. यादरम्यान, आरोपी शिक्षिकेनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

कोणाला काहीही न सांगण्याची दिली धमकी

पोलीस तक्रारीत म्हटलं की, आरोपी शिक्षकाने गुन्हा केल्यानंतर मुलीला याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. शिकवणी शिक्षकाच्या क्रूर वर्तनामुळे घाबरलेल्या अवस्थेतील पीडितेनं घटनेबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. 

पोटात दुखत असल्याची मुलीकडून तक्रार

काही वेळानंतर मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. कुटुंबियांनी विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगण्यास नकार दिला होता. तिला एका महिला डॉक्टरकडे नेण्यात आले, तपासणीनंतर पीडित गर्भवती असल्याचे दिसून आले होते. संबंधित प्रकरणाची माहिती समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते भायभीत झाले. 

हे ही वाचा : लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरले, अन् समोरून आलेल्या टँकरने चिरडलं, 6 जणांचा मृत्यू

संबंधित घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली असता, गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर अंकलेश्वर बी डिव्हिजन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कारवाई सुरु केली. चार वर्षापासून शिकवणी घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित प्रकरणात शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.