धावत्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये एकच खळबळ अन्...

पृथ्वीराज पाटील

18 Nov 2026 (अपडेटेड: 18 Nov 2026, 12:58 PM)

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादहून मुंबईकडे ही रेल्वे येत होती. यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत.

Vande Bharat Attack

Vande Bharat Attack

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक

point

प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण

Vande Bharat Attack : अहमदाबादहून मुंबई सेंट्रलच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सूरत आणि नवसारी दरम्यान सचिन रेल्वे स्थानकाजवळ काही अज्ञातांनी चालत्या ट्रेनवर अचानक दगडफेक केली. या हल्ल्यात दगड थेट C-4 डब्याच्या खिडकीवर बसल्याने खिडकीची काच फुटली असून, या जोरदार आवाजामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हे वाचलं का?

दगडफेक अन् रेल्वे प्रवाशांमध्ये अफरातफरी

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच अफरातफरी उडाली, मात्र सुदैवाने या दगडफेकीत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. या ट्रेनमध्ये पालघरचे रहिवासी तवक्कल शेख हे देखील प्रवास करत होते, ज्यांनी या थरारक घटनेचा अनुभव घेतला.

हे ही वाचा : मुंबई : लोकल ट्रेन सुरु झाली अन् नाशिकच्या तरुणाने फेकून मारला चाकू, पुढं काय घडलं?

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तपास सुरू केला. देशातील या अत्याधुनिक आणि हायस्पीड रेल्वे गाड्यांवर वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : अजित पवार विमान अपघात प्रकरण : शेवटचे 3 तास, सीसीटीव्ही आणि RTI ची माहिती

कठोर पावले उचलण्याची गरज

लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासात अडथळा आणणाऱ्या आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अशा असामाजिक घटकांवर कठोर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता अधिक ठोस आणि कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.