प्रेयसीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

सुशांत काळे

17 Nov 2026 (अपडेटेड: 17 Nov 2026, 08:03 PM)

Crime news : आदिवासी समाजातील तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. तरुणी ही एका गार्डनमध्ये आपल्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. अशा स्थितीत दोन तरुणांनी तिला पकडलं. त्यानंतर तरुणीने विरोध केला असता, आरोपींनी प्रेयसीला लाठीकाठीने बेदम मारहाण केली. तसेच तरुणीने एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Crime news

Crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जोडप्यांना शिवीगाळ करत प्रियकराला मारहाण

point

निर्जनस्थळी नेत तरुणीवर एकानंतर एक आळीपाळीने अत्याचार 

Crime news : एका आदिवासी समाजातील तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. तरुणी ही एका गार्डनमध्ये आपल्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. अशा स्थितीत दोन तरुणांनी तिला पकडलं. त्यानंतर तरुणीने विरोध केला असता, आरोपींनी प्रेयसीला लाठीकाठीने बेदम मारहाण केली. तसेच तरुणीने एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपींनी पीडितेचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण छत्तीसगड येथील रायगढमधील आहे. या घटनेनं तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याणकरांच्या नळाला पाण्याऐवजी किडे-जंतू, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. छत्तीसगडच्या अटल रॉक गार्डनरमध्ये एका आदिवासी तरुणी आपल्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. सायंकाळी 4 वाजता दोघेही गार्डनमध्येच होते. इतक्यात त्या ठिकाणी राहुल पटेल (वय 21) आणि फनेश्वर पटेल (वय 20) हे घटनास्थळी पोहोचले होते. 

जोडप्यांना शिवीगाळ करत प्रियकराला मारहाण

संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, जोडप्यांना थांबविले आणि त्यांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर आरोपींनी तरुणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा प्रियकराने विरोध केला असता, दोन तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला होता. आरोपींनी लाठी काठीने बेदम मारहाण केली. नंतर त्याच्याच शरीरावर वार करण्यात आले होते. एवढंच नसून आरोपींनी प्रियकराच्या खिशातून पैसे देखील नेले. 

निर्जनस्थळी नेत तरुणीवर एकानंतर एक आळीपाळीने अत्याचार 

प्रियकराला बेदम मारहाण केल्यानंतर, दोघांनाही दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. तिथे  एकानंतर एका आरोपींनी लैंगिक अत्याचार केला. नंतर त्यांनी मोबइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड देखील केला होता. रात्री दोन्ही आरोपींना एका निर्जनस्थळी सोडून ते फरार झाले. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच ब्लॅकमेल देखील करण्यात आले होते. आरोपींनी मोबाइल युपीआयच्या माध्यमातून 1,200 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. याव्यतिरिक्त प्रियकराकडून देखील आरोपींनी 10 हजार रक्कम घेतली. 

व्हिडिओ केले रेकॉर्ड

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी पीडितेनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांना घडलेला घटनेचा संपूर्ण प्रकार सांगितला होता. तक्रारीत सामूहिक अत्याचार, मारहाण आणि अत्याचार करून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे नमूद केले होते. प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : Mumbai Local Train Crime : प्रवाशांमधील वादातून 53 वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला, Video व्हायरल

यानंतर आता पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी काही पथक पाठवले आहेत. पोलीस अधीक्षकाच्या माहितीनुसार, पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींची ओळख तपासून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे.