Crime News : बेंगळुरूमध्ये शुक्रवारी (13 नोव्हेंबर) सकाळी एका 39 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाची त्याच्या पत्नीसमोरच निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चरण गौडा असे या मृत व्यावसायिकाचे नाव असून ते मूळचे चन्नपटना तालुक्यातील रहिवासी होते आणि सध्या कुटुंबासह येलहंका येथील कोगिलू परिसरात राहत होते. सकाळी दहाच्या सुमारास आपल्या कार्यालयाजवळ पोहोचले असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
बायकोसमोरच सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, चरण गौडा हे आपल्या पत्नीसोबत एका बँकेजवळ असलेल्या कार्यालयाबाहेर कारमधून आले होते. त्यांची पत्नी कारमधून उतरून कार्यालयाच्या दिशेने जात असतानाच, चरण गौडा मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. हल्लेखोर आधीपासूनच गौडा यांची वाट पाहत दबा धरून बसले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : सरकारने जाहीर केली तलाठी पदांसाठी मेगाभरती, काय आहेत पात्रतेचे निकष?
हत्येचा गुन्हा दाखल
या भीषण हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत चरण गौडा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिवसाढवळ्या पत्नीच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.
हे ही वाचा : एक इंजेक्शन अन् 17 वर्षीय प्राचीचा मृत्यू, संतापलेल्या लोकांनी मेडिकलला लावली आग; नेमकं प्रकरण काय?
रिअल इस्टेट व्यवसायातील वाद
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या रिअल इस्टेट व्यवसायातील वादातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलीस इतर सर्व संभाव्य बाजूंनीही या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT












